यंदा गणेशचतुर्थीची तारीख १९ नव्हे १८ सप्टेंबर; गौरव देशपांडे यांची माहिती

By श्रीकिशन काळे | Published: August 17, 2023 04:55 PM2023-08-17T16:55:53+5:302023-08-17T16:56:35+5:30

यंदा गणपती १८ सप्टेंबर रोजी बसवावा, १९ सप्टेंबरची तिथी योग्य नाही

This year the date of Ganesh Chaturthi is September 18 not 19; Gaurav Deshpande's information | यंदा गणेशचतुर्थीची तारीख १९ नव्हे १८ सप्टेंबर; गौरव देशपांडे यांची माहिती

यंदा गणेशचतुर्थीची तारीख १९ नव्हे १८ सप्टेंबर; गौरव देशपांडे यांची माहिती

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्रातील पंचांग हे अमेरिकेतील नासाकडून मिळालेल्या माहितीवर (एफीमेरीज) यंदाची गणेश चतुर्थीची तारीख दिली आहे. खरंतर सूर्यसिध्दांताचे पालन करत असलेल्या पंचागानूसार श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा १८ सप्टेंबर रोजी करावे, असे आवाहन सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांगचे गौरव देशपांडे यांनी केले आहे.

मागील ६० वर्षांपासून महाराष्ट्रातील पंचांगकर्ते नासाच्या रेडीमेड एफीमेरजीचा वापर करत आहे. नासाच्या या माहितीमुळे महाराष्ट्रातील प्रमुख सणांच्या तिथी चुकून अनेकदा तारखेमध्ये घोळ होत आहे. भारतात पंचांगासाठी दोन पध्दती सध्या प्रचलित आहेत. त्यातील पहिली पध्दत ही प्राचीन पध्दत असून, तिला सूर्यसिध्दांत पध्दती असे म्हटले जाते. तर दुसरी पध्दत ही १९५० पासून नासाकडून उपलब्ध होणाऱ्या माहितीवर तयार होणाऱ्या पंचांगाची आहे. सूर्यसिध्दांत पध्दती ही सूर्यसिध्दांत या ग्रंथावर आधारलेली आहे. हा एक प्राचीन खगोलशास्त्रीय समीकरणे असलेला ग्रंथ आहे. या ग्रंथात गणिती समीकरणांच्या माध्यमातून सूर्योदय, सूर्यास्त, ग्रहणे यांच्या वेळा, तिथी आदी गोष्टी पंचांगात मांडल्या जातात. परंतु, १९५० पासून नासाकडून येणाऱ्या माहितीवरून पंचांगकर्ते तिथी, वेळ काढू लागले. त्यामुळे आपल्याकडील सणवार चुकूत आहेत. यंदा गणपती १८ सप्टेंबर रोजी बसवावा, १९ सप्टेंबरची तिथी योग्य नाही. विश्व पंचांग आणि वैष्णवांचे मंत्रालय, उत्तराधी मठ, कर्नाटक आदी प्रमुख पंचांग पाहिली तर गणेश चतुर्थी १८ सप्टेंबर रोजी असल्याचे नमूद आहे. मग महाराष्ट्रातच काही पंचांगकर्ते १९ सप्टेंबर रोजीची तारीख देत आहेत. आपल्याकडे सणवार तिथीवरून सांगितले जातात, तारखेवरून नाही.’’

Web Title: This year the date of Ganesh Chaturthi is September 18 not 19; Gaurav Deshpande's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.