थोरांदळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:52+5:302021-08-23T04:12:52+5:30
सिद्धी विष्णू घुले, प्रियांका संजय विश्वासराव, सोनाली रमेश टेमगिरे व शुभम मंगेश फुटाणे या चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार ...
सिद्धी विष्णू घुले, प्रियांका संजय विश्वासराव, सोनाली रमेश टेमगिरे व शुभम मंगेश फुटाणे या चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली या संस्थेमार्फत या परीक्षेचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व पुढील शिक्षणास मदत व्हावी यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. थोरांदळे शाळेतील उपक्रमशील आदर्श शिक्षक संतोष कृष्णा गवारी यांनी लॉकडाऊनच्या काळातही अभ्यासात खंड पडू न देता विद्यार्थ्यांना आॅनलाईन व मळ्यात जाऊन वैयक्तिक मार्गदर्शन केले. एकूण दहा विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. ते सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मेरिटमध्ये आलेल्या चार विद्यार्थ्यांना एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
सभापती संजय गवारी, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, विस्तार अधिकारी संचिता अभंग, केंद्रप्रमुख गजानन पुरी, मुख्याध्यापक दिलीप केंगले, सरपंच पुष्पाताई टेमगिरे व ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक संतोष गवारी यांचे अभिनंदन केले आहे.
थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील एनएमएमएस परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक.