‘त्या’ मुलांच्या वाट्याला आले ‘पोरकेपण’

By admin | Published: June 27, 2017 07:45 AM2017-06-27T07:45:38+5:302017-06-27T07:45:38+5:30

रागाच्या भरात पत्नीचा त्याने खून केला. पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, त्यांची दोन्ही निरागस मुले मात्र या प्रकारात पोरकी झाली.

'Those' came to the children's side | ‘त्या’ मुलांच्या वाट्याला आले ‘पोरकेपण’

‘त्या’ मुलांच्या वाट्याला आले ‘पोरकेपण’

Next

महेंद्र कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : रागाच्या भरात पत्नीचा त्याने खून केला. पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, त्यांची दोन्ही निरागस मुले मात्र या प्रकारात पोरकी झाली. २ वर्षाची मुलगी ‘खुशी’ आणि ९ महिन्याचा मुलगा ‘सुल्तान’ या दोन्ही मुलांचा संभाळ त्यांच्या शेजारी राहणारे सुकल कुटुंबीय करीत आहेत.
पोलिसांनी जावेद बदलू पठाण यास अटक केली. शुक्रवारी रात्री जेवनाच्या कारणावरून पठाण दाम्पत्यामध्ये भांडण झाले होते. मध्यरात्री पुन्हा त्यांच्यामध्ये भांडण झाले. रागाच्या भरात आरोपी जावेद याने तिचा गळा दाबून खून केला. पहाटे त्यानेच तिला दवाखान्यात आणले तेव्हा तीचे निधन झाले असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. बारामतीमधील रूई पाटी येथील मोरया अपार्टमेंट मध्ये ते रहात होते. ते मूळ राहणार ता. खेर जि. अलिगढ उत्तरप्रदेश) येथील आहेत.

Web Title: 'Those' came to the children's side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.