औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्यावरून ज्यांना अटक, त्यांनीच बदनामीची उलटी केस करा-प्रकाश आंबेडकर

By रोशन मोरे | Published: August 4, 2023 04:14 PM2023-08-04T16:14:15+5:302023-08-04T16:41:54+5:30

औरंगजेबाचे स्टेट्स ठेवलेल्यांनी आता हिम्मत दाखवणे गरजेचे आहे

Those who are arrested for keeping the status of Aurangzeb they should file a reverse case of defamation - Prakash Ambedkar | औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्यावरून ज्यांना अटक, त्यांनीच बदनामीची उलटी केस करा-प्रकाश आंबेडकर

औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्यावरून ज्यांना अटक, त्यांनीच बदनामीची उलटी केस करा-प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

पुणे : प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या मजारीवर जाण्यावरून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावरून आंबेडकर यांनी उत्तर दिले आहे. कुणाच्या मजारीवर जाऊन, अथवा कब्रस्तानात जाऊन फुले वाहण्यास बंदी असल्याचा कायदा दाखवावा. ज्या मुलांना औरंगजेबाचे स्टेट्स ठेवण्यावरून अटक केली होती. त्यामुलांनीच त्यांना बदनामी करण्यात आल्याची उलटी केस करावी. त्यांनी हिम्मत दाखवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहेत. पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा देत आंबडेकर म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. जर, पंतप्रधान असा आरोप करत असतील तर त्यांनी संपूर्ण माहिती संबंधित यंत्रणांकडून घेतली असेल. त्यामुळे दहा दिवसांत संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवावा. गुन्हा दाखल केला नाही तर राष्ट्रवादीची, जनतेची माफी पंतप्रधानांनी मागावी. अन्यथा पक्ष संपवण्यासठी पंतप्रधान असे आरोप करत करत आहेत. असे आम्ही समजू आणि आंदोलन करू. पंतप्रधानांनी आरोप करून एक राजकीय पक्षाच्या संपवण्याची प्रक्रिया करत आहेत. जर पंतप्रधान आरोप करत असतील तर त्यांनी एफआयआर दाखल करावी. दखल करत नसतील तर ते देशाला फसवत आहेत. राजकीय पक्ष हे देशाची ओळख आहेत. देशाचे राजकारण हे ब्लॅकमेलरचे, दमदाटीचे राजकारण होऊ नये. ब्लॅकमेल करून पक्ष संपवले जात आहे.

शिवसेना, काँग्रेसला आवाहन करणार

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राजकीय पक्ष पंतप्रधान संपवण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला आवाहन करणार आहोत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यात सहभागी असल्याने ते आंदोलनात येतीलच. शिवाय इतर पक्ष, संघटनांनी या आंदोलनात सहभागी व्हावे.

छान छान चालल्यामागे ब्लॅकमेलिंग

राष्ट्रवादीवर आरोप केल्यानंतर अजित पवार सत्तेत सहभागी झाले. तर, नंतर पुण्यात झालेल्या कार्यक्रमात शरद पवार पंतप्रधानांसोबत स्टेजवर होते. त्यामुळे सगळ छान छान सुरु असलेल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, या छान छान दिसण्यामागे ब्लॅकमेलिंग सुरु आहे का? हे तपासून पाहिले पाहिजे असे आंबेडकर म्हणाले.

Web Title: Those who are arrested for keeping the status of Aurangzeb they should file a reverse case of defamation - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.