शिरूरमधून फरार झालेले 'ते' १० जण मरकजला गेलेल्यांपैकी नाहीत ; विभागीय आयुक्तांचे स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 08:57 PM2020-04-03T20:57:16+5:302020-04-03T21:27:23+5:30

दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील 'आलमी मरकज' या तबलिगी जमातीच्या मुख्यालयात झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या सुमारे ३७९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींची यादी संबंधित राज्यांना पाठवण्यात आली असून त्यांचा शोध घेतला  जात आहे.

Those who 'fled to Shirur' are not the same as those who went to Merkaj; Explanation of the Divisional Commissioner | शिरूरमधून फरार झालेले 'ते' १० जण मरकजला गेलेल्यांपैकी नाहीत ; विभागीय आयुक्तांचे स्पष्टीकरण 

शिरूरमधून फरार झालेले 'ते' १० जण मरकजला गेलेल्यांपैकी नाहीत ; विभागीय आयुक्तांचे स्पष्टीकरण 

Next

पुणे ; दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील 'आलमी मरकज' या तबलिगी जमातीच्या मुख्यालयात झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या सुमारे ३७९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्तींची यादी संबंधित राज्यांना पाठवण्यात आली असून त्यांचा शोध घेतला  जात आहे. पुण्यातून या कार्यक्रमात सहभागी व्यक्तींना प्रशासन शोधत आहे. यातील बहुतांश व्यक्तींना शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात  होमक्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेल्या १० व्यक्ती पळून गेल्याचे शुक्रवारी समोर आले. 

ही बातमी माध्यमातून समोर आल्यावर एकच गोंधळ उडाला होता. अखेर विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, ही लोक 23 फेब्रुवारीला दिल्लीहून पुण्यामध्ये आली होती आणि पुण्यातच  6 मार्चपर्यंत होती. 6 मार्चला ही लोक शिरुरमधे शिफ्ट झाली, शिरुरच्या एका मजिदमध्ये ते थांबलेले होते. 1 एप्रिलला जेव्हा दिल्लीची निजामुद्दीनची घटना उघडकीस आली त्यानंतर त्यांना होमक्वारंटाइनचे  शिक्के मारण्यात आले होते. मात्र ती लोक फरार झालेली आहेत. वैद्यकीय औषध घेवून जाणा-या ट्रकमधून ते फरार झाले असा पोलीसांचा अंदाज आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 पुढे ते म्हणाले की, 'त्यांचे मोबाईल नंबर आमच्याकडे आहेत. सीडीआरवरून त्यांचे  ट्रेसिंग केल्या जात आहे. परंतू निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागाची जी यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये या व्यक्तींची नाव नव्हती आणि ही त्यापैकी आहेत असे आमच्या रेकॉर्डवरून तरी स्पष्ट होत नाही. ती तबलीगीशी संबंधीत आहेत ही वस्तुस्थिती आहे, आणि म्हणूनच त्यांचा शोध सुरू आहे. मात्र ते पुण्यामध्ये 23 फेब्रुवारीलाच आले होते असेही त्यांनी स्पष्ट केले'. 

Web Title: Those who 'fled to Shirur' are not the same as those who went to Merkaj; Explanation of the Divisional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.