जे पुस्तके वाचतील त्यांच्या पंखात उडण्याचे बळ येईल : प्रा. मिलिंद जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:45+5:302021-06-27T04:08:45+5:30
बुधवार पेठेत काम करणारी सहेली संघ संस्था आणि मैत्र युवा फाऊंडेशनने वेश्यावस्तीतील (देहविक्री करणाऱ्या महिला) महिलांसाठी विचारांची पुस्तकपेटी हा ...
बुधवार पेठेत काम करणारी सहेली संघ संस्था आणि मैत्र युवा फाऊंडेशनने वेश्यावस्तीतील (देहविक्री करणाऱ्या महिला) महिलांसाठी विचारांची पुस्तकपेटी हा अनोखा उपक्रम सुरु केला. लॉकडाऊनमुळे बंद होता. यावेळी सहेली संघच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी, मैत्र युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, सहेली संघच्या अध्यक्षा महादेवी मदार आदी उपस्थित होते.
तेजस्वी सेवेकरी म्हणाल्या, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये आजमितीस १ हजार ५०० हून अधिक महिला आहेत. त्यामध्ये मराठी, हिंदीसह बंगाली, तमीळ आदी भाषा बोलणाऱ्या व वाचू शकणाऱ्या महिलांचा समावेश आहे. त्यांचा मानसिक विकास व्हावा, त्यांचे विचार परिवर्तन व्हावे, याउद्देशाने हा उपक्रम घेतला आहे.
संकेत देशपांडे म्हणाले, महिलांनी पुस्तक पेटीतून आवडतील अशी पुस्तके घेऊन वाचावी, हा यामागील उद्देश आहे. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या व मान्यवरांच्या कार्याची माहिती देणारी पुस्तके पेटीमध्ये आहेत.
दरम्यान, विचारांची पुस्तकपेटीकरिता प्रा. मिलिंद जोशी ५१ पुस्तके दिली. पुणेकरांनी, साहित्यिकांनी, प्रकाशकांनी देखील पुस्तके देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे तसेच बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजसमोर असलेल्या सहेलीच्या कार्यालयात पुस्तके आणून द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
-----------------------------