महिना उलटला तरी मेट्रोचा आराखडा नाही तयार
By admin | Published: November 24, 2015 01:26 AM2015-11-24T01:26:00+5:302015-11-24T01:26:00+5:30
मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गात झालेला बदल व वाढलेल्या खर्चाचा सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देऊन महिना उलटला,
पुणे : मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गात झालेला बदल व वाढलेल्या खर्चाचा सुधारित आराखडा सादर करण्याचे आदेश देऊन महिना उलटला, तरी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनकडून (डीएमआरसी) अद्याप आराखड्याचे काम पूर्ण झालेले नाही. सुधारित आराखडा महापालिकेला २३ नोव्हेंबरपर्यंत देऊ, असे डीएमआरसीने सांगितले होते, तरी सोमवार संध्याकाळपर्यंत हा आराखडा मिळालेला नाही.
वनाज ते रामवाडी या मार्गावरील मेट्रो आता जंगलीमहाराज रस्त्याऐवजी नदीकाठाने जाणार आहे. जुन्या आराखड्यामध्ये त्यानुसार बदल केला जात आहे. त्याचबरोबर वाढलेल्या खर्चाचाही माहिती द्यावी लागणार आहे. त्यानुसार हा अहवाल तयार करून डीएमआरसीकडून तो दहा नोव्हेंबरपर्यंत मिळणे अपेक्षित होते. दिवाळीच्या सुटट्ीमुळे त्याचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याचे डीएमआरसीकडून स्पष्ट करून तो २३ नोव्हेंबरपर्यंत महापालिकेस मिळेल, असे सांगण्यात आले होते.
महापालिकेला हा आराखडा प्राप्त झाल्यानंतर तो राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र शासनाला सादर केला जाईल.