म्हाडाच्या घरांसाठी सव्वाचार हजार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 05:41 AM2018-05-24T05:41:46+5:302018-05-24T05:41:46+5:30

केंद्र सरकारने २०२२पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची योजना आखली आहे.

Thousands of applications for MHADA housing | म्हाडाच्या घरांसाठी सव्वाचार हजार अर्ज

म्हाडाच्या घरांसाठी सव्वाचार हजार अर्ज

Next

पुणे : म्हाडाने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड येथील ३ हजार १३९ सदनिका आणि २९ भूखंडांच्या विक्रीसाठी जाहीर केलेल्या लॉटरी योजनेसाठी बुधवार (दि. २३)अखेरीस ४ हजार २५८ जणांनी नोंदणी केली. म्हाडा पुणे विभागाचे सभापती समरजितसिंग घाटगे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे या वेळी उपस्थित होते. केंद्र सरकारने २०२२पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची योजना आखली आहे. या पार्श्वभूमीवर, हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. म्हाडा पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी या घरांची सोडत जाहीर केली आहे. त्यासाठी लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नागरिकांना १९ जून २०१८ पर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, २० जूनपर्यंत पैसे भरता येतील. या घरांची सोडत ३० जूनला होणार आहे.
म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे म्हणाले, ‘‘यापूर्वी म्हाडाने डिसेंबर २०१६मध्ये २ हजार ५०० घरांची सोडत जाहीर केली होती. त्याचे वाटपही करण्यात आले आहे. म्हाडाची सोडतही पूर्णपणे आॅनलाईन आहे. नोंदणी करणे, सोडत जाहीर करणे आणि प्रतीक्षा यादी करणे आदी प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन पद्धतीनेच पार पडणार आहे. घराच्या बांधकाम क्षमतेची ५० वर्षे हमी आम्ही देतो. भूकंपरोधक बांधकाम आणि आधुनिक सुविधा ही प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत.’’

या ठिकाणी घरे उपलब्ध परिसराचे नाव घरांची संख्या
नांदेड सिटी १०८०
रावेत, पुनावळे १२०
वाकड २२
चहोली, वडमुखवाडी २१४
मोशी २३९
येवलेवाडी ८०
कात्रज २९
धानोरी ५१

Web Title: Thousands of applications for MHADA housing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.