परदेशी प्लेमिंगोसह हजारों पक्षांचे उजनी तीरावर भरले जणू मुक्त संमेलन...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 06:36 PM2020-05-05T18:36:04+5:302020-05-05T18:37:04+5:30

मानवी संचारबंदी उजनी जलाशयावरील प्लेमिंगोसाठी आनंददायी..

Thousands of birds flocked to Ujani Tira | परदेशी प्लेमिंगोसह हजारों पक्षांचे उजनी तीरावर भरले जणू मुक्त संमेलन...

परदेशी प्लेमिंगोसह हजारों पक्षांचे उजनी तीरावर भरले जणू मुक्त संमेलन...

googlenewsNext
ठळक मुद्देसंचारबंदीमुळे गेली दीड महिन्यापासून पक्षी पर्यटन व मासेमारी बंद

सतीश सांगळे - 
कळस : कोरोना संक्रमणामुळे शासनाने लागू केलेली मानवी संचारबंदी उजनी जलाशयावरील प्लेमिंगोसाठी आनंददायी ठरली आहे. संचारबंदीमुळे गेली दीड महिन्यापासून पक्षी पर्यटन व मासेमारी बंद असल्यामुळे विणीच्या हंगाम अंतिम टप्प्यात असलेल्या हजारों पक्ष्याचे उजनी तीरावर जणू मुक्तसंमेलनच भरलेचे चित्र दिसत आहे.
युरोप व कच्छच्या रणातून हे दिमाखदार,लोभसवाण्या रुपाचे हजारोंच्या संख्येने आलेले परदेशी पक्षी प्लेमिंगो चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर विणीचा हंगाम संपवुन मे महिन्यात आपल्या मूळस्थानी परतत असतात. परंतु यंदा थंडी पडण्याअगोदरच हजारोंच्या संख्येने येऊन दाखल झालेले फ्लेमिंगो मुक्त वातावरण असल्याने उजनी जलाशयावर मुक्कामाला आहेत .त्यांचा मुक्त संचार याठिकाणी सुरू आहे.
चंबळच्या खोऱ्यातून आलेला नदीसुरय तसेच आसामहून आलेला उघड्या चोचीचा करकोचा मोठ्या संख्येने आहे. मात्र ,हे विहंगम दृश्य पाहण्याची संधी कोरोनाने नागरिकांची घेतली आहे.कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर जलाशयातील पाणी प्रदुषण व ध्वनी प्रदूषण थांबल्यामुळे  उजनी जलाशय परिसर पक्ष्यानीगजबजला आहे. थंडीची चाहूल लागली की,आॅक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांमध्ये पुणे- सोलापूर  जिल्ह्यातील उजनीच्या पाणलोट क्षेत्रासह भिगवण परिसरातील डाळज,डिकसळ,कोंढार चिंचोली, या भागात वास्तव करतात. या वर्षी चांगला पाऊस झाला असल्यामुळे  जिल्ह्यात इतरत्र विखरलेले फ्लेमिंगो मार्च-एप्रिलमध्ये उजनी जलाशयावर एकवटले पक्षांचा विणीचा हंगाम सध्या अंतिम टप्प्यातआहे सध्या आढळणाºया फ्लेमिंगोंच्या समूहात त्यांच्या लहान पिल्लांचीसंख्या वाढत आहे.
मासेमारी बंद असल्याने पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध होत आहे. उजनी जलाशयातील पाण्याचे मोठ्याप्रमाणावर बाष्पीभवन व त्याचप्रमाणेपिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडल्याने  परिसरातील पाण्याखाली असणारा भाग अनेक ठिकाणी उघडा पडला आहे. तापमानाच्या पाºयाने चाळीसी पार केली असली तरी उजनी जलाशच्या पाणलोट क्षेत्रातील काही ठिकाणी या पक्ष्यांनाआल्हाददायक वातावरण आहे.त्याचा परिणाम म्हणून त्यांचा वावर  याठिकाणीअजूनही पाहावयास मिळत आहे.
याठिकाणी फ्लेमिंगो,  कंठेरी चिखल्या, चक्रवाक बदक, नदीसुरय,  तुतवार, जांभळी पाणकोंबडी, पांढरा मानेचा करकोचा, शराटी, पाणकावळा, थापट्या,हळदीकुंकू बदक, युरेशियन कुरव  तपकिरी डोक्याचा कुरव, उघडचोच करकोचा किंवा मुग्धबलाक , थापट्या, राखी बगळा अशा प्रजातींचे पक्षी पाणथळ व पाणगवतांच्या जागा अशी त्यांच्या पसंतीची स्थळे शोधत उजनी जलाशयावरील पाहुणचार घेत आहेत. निर्भयीत वातावरणामुळे उन्हाळ्यात प्रजनन व वीण साठीहा कालावधी अनकुल आहे. त्यामुळे आगामी काळात, पक्षांची संख्या वाढण्याचीशक्यता पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
 सध्या संचारबंदी लागू असल्याने जलाशयातील मासेमारी बंद आहे तसेच ध्वनी प्रदूषण व जलप्रदूषण नसल्याने पक्षांचा मुक्त वावर वाढला आहे .जलाशयातीलभागात आजही सुमारे ८ ते १० हजार प्लेमिंगो (रोहीत) पक्षी संचार करत आहेत. याशिवाय अनेक पक्षी या ठिकाणी वास्तव करत आहेत प्रजनन साठी अनकुलवातावरण आहे .विणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून मे अखेर पक्षी परतीचाप्रवास सुरु करतील चार- पाच पक्षी परदेशी प्रवास करून ज्याठिकाणी जायचेआहे .त्याचा अंदाज घेवून  सांगावा  इतर पक्षांना देतात त्यामुळेहवामानाची परिस्थिती इतर पक्षांना समजते.
नितीन डोळे, पक्षी अभ्यासक

Web Title: Thousands of birds flocked to Ujani Tira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.