घाण, गुन्हेगारीमुळे नरकयातना, जनता वसाहत, समस्यांच्या दलदलित राहतात हजारो नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:25 AM2017-11-30T03:25:43+5:302017-11-30T03:26:22+5:30

जनता वसाहतीमध्ये शौचालयांची बिकट अवस्था आहे. अस्वच्छ परिसर, पाण्याची टंचाई, विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था त्यामुळे रस्त्यावर वाहणारी घाण असे समस्येचे थैमान या परिसरात असून

 Thousands of citizens live in dirty, dysfunctional crime due to crime, public squash, and problems | घाण, गुन्हेगारीमुळे नरकयातना, जनता वसाहत, समस्यांच्या दलदलित राहतात हजारो नागरिक

घाण, गुन्हेगारीमुळे नरकयातना, जनता वसाहत, समस्यांच्या दलदलित राहतात हजारो नागरिक

googlenewsNext

- गौरव कदम
सहकारनगर : जनता वसाहतीमध्ये शौचालयांची बिकट अवस्था आहे. अस्वच्छ परिसर, पाण्याची टंचाई, विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था त्यामुळे रस्त्यावर वाहणारी घाण असे समस्येचे थैमान या परिसरात असून, गुन्हेगारी व अवैध धंदे, राजकीय व शासकीय दुर्लक्ष यामुळे येथील नागरिक नरकयातना जगत आहेत.
आपल्या मुलांना भविष्यात निरोगीपणे जगता यावे, यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी शासकीय योजनेतील वैयक्तिक शौचालय बांधणीतील गैरकारभार चव्हाट्यावर आला होता. म्हणजेच शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यातच शुद्ध फसवणूक होत असल्यास परिस्थिती आणखी दयनीय होत जाणार आहे.
वसाहतीमध्ये मोठे दिखाऊ प्रकल्प करून सर्वसामान्य जनतेने भरलेल्या कराचा चुराडा करण्यापेक्षा स्वछता, शैक्षणिक, आरोग्यदृष्ट्या चांगले प्रकल्प उभारणे व टिकविणे येथे गरजेचे आहे. एकीकडे सर्वसामान्य पुणेकर पाणीपट्टी भरून पाणी काटकसरीने वापरत असताना जनता वसाहतमध्ये मात्र पिण्याच्या पाण्याचा अपव्यय पाहून अंगावर काटा येतो. सकाळच्या वेळेत येथे बºयाच ठिकाणी पाण्याचे नळ बंद केलेच जात नाहीत. पाणी वाहत मलवाहिन्यांत जात असते. अनेक ठिकाणी पाण्याच्या वाहिन्या नादुरुस्त असून, त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहण्यास मिळाले.

गुन्हेगारी व अवैध धंदे
जुन्या हिंदी सिनेमात पाहण्यास मिळत असत, तसेच अनेक भाई-दादा जनता वसाहत झोपडपट्टीमध्येसुद्धा पाहण्यास मिळतात. सध्या गुन्हेगारीचा आलेख कमी असला, तरी दारूअड्डे, अवैध धंदे येथे सुरूच आहेत. नाना प्रकारची व्यसने युवक करताना पाहण्यास मिळतात. युवकांना नोकरी-रोजगार नसल्याने व्यसने व गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण वाढत आहे 
इतक्या मोठ्या जनता वसाहतीमध्ये एकही अभ्यासिका नाही. महिलांना सुद्धा रोजगार मोठ्या प्रमाणात नसल्याने धुण्या-भांड्याच्या कामांव्यतिरिक्त रोजगार, बचत गट, लघू महिला उद्योग सुरू होणे गरजेचे आहे.

दवाखान्याचा अभाव, कचरा, रस्ते, शौचालये बेरोजगारी आणि वाढते अतिक्रमण

येथील पार्किंगचा प्रश्न मोठा असून, तो सोडविला जाणे गरजेचे आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, त्याचा पाठपुरावा आम्ही करतच आहोत; अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. महिला व युवकांना चांगला रोजगार व प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे, अभ्यासिका वर्ग सुरू होणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचारी, अतिक्रमण विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने अतिक्रमणे व झोपड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
- सूरज लोखंडे,
सामाजिक कार्यकर्ता

हे जनता वसाहतमध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत. जनता वसाहत येथे नागरिकांना अनेक समस्या भेडसावताना दिसत आहेत; परंतु वसाहत पातळीवर येथील रहिवाशांना भविष्यात स्वत:ची हक्काची घरे मिळाल्यानंतरही तेथील देखभाल खर्च करणे याची मानसिकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगली रोजगारनिर्मिती होणे गरजेचे आहे. महिलांना लघुउद्योग प्रकल्पाद्वारे सकारात्मक पाठिंबा देणे गरजेचे आहे. संस्कार, आरोग्य, निर्व्यसनीपणा, शिक्षण यामुळेच युवक विकसित होऊ शकतो. नागरिकांना स्वछतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. 
- राहुल माने,
आदर प्रतिष्ठान, सामाजिक कार्यकर्ते

राजकीय व शासकीय दुर्लक्ष ठरतेय अंधारमय
जनता वसाहतीमध्ये राजकीय व शासकीय दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी एसआरए प्रकल्पातील गैरव्यवहारविरुद्ध मोठ्या संख्येने मोर्चा काढून प्रकल्पातील फसवणुकीस विरोध केलेला आहे.
येथील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या हक्काची घरे होण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे. तसेच जनता वसाहतीमधील कुठलाही नागरिक बेघर होऊ नये, यासाठी लढा देणार आहे.
वस्तीतील समस्यांचे निराकरण होताना दिसत नाही
शौचालयांची बिकट अवस्था आहे. पाण्याची टंचाई, विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असते. त्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. डोंगर भागात, कॅनॉलकडेने कचरा साठून आहे. कचरा व्यवस्थापनचा आराखडाच तयार नाही.
अ‍ॅम्ब्युलन्सच्या शेडने फक्त जागा अडवून ठेवली आहे. त्यात नागरिकांच्या गरजेला अ‍ॅम्ब्युलन्सच उपलब्ध नाही. परिसरात औषधफवारणी होत नसल्याने संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

जनता वसाहतीमध्ये लोकांच्या मागणीनुसार हक्काची पक्की घरे मिळणे गरजेचे आहे, यासाठी लोकांशी संवाद साधून शासकीय योजने अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण होत असल्यास त्याचे स्वागत आहे. या विषयात राजकारण न होता, नागरिकांनी पूर्ण माहिती घेऊन पुढे येणे गरजेचे आहे. भविष्यात महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजही तीसपेक्षा जास्त बचत गटांच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व वचक नसल्यामुळे झोपड्या वाढत आहेत. संरक्षण भिंत होणे गरजेचे आहे. पार्किंगप्रश्नाबाबत प्रामाणिकपणे पाठपुरावा करूनही प्रशासकीय पातळीवर सहकार्य होत नसल्याने पार्किं ग प्रश्न सुटण्यास वेळ लागत आहे. सांस्कृतिक कार्यक्रम होण्यासाठी कमी बजेटमध्ये हॉल तयार करण्यात आला आहे.
- प्रिया गदादे-पाटील, नगरसेविका

Web Title:  Thousands of citizens live in dirty, dysfunctional crime due to crime, public squash, and problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे