पुणे जिल्ह्यात साडेतीन हजार रोजगार संधी; ७ जानेवारीला रोजगार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 07:22 PM2018-01-02T19:22:40+5:302018-01-02T19:23:54+5:30
दिनदयाळ अंत्योदय योजना नागरी उपजीविका अभियानांतर्गत येत्या रविवारी (दि. ७) रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पुणे : जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना नागरी उपजीविका अभियानांतर्गत येत्या रविवारी (दि. ७) रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होईल.
शहर, भोसरी, पिंपरी-चिचंवड व चाकण औद्योगिक परिसरातील ३९ उद्योजकांनी यात सहभाग नोंदविला आहे. त्यांच्याकडे एकूण ३ हजार ५५५ पदे रिक्त आहेत. किमान दहावी, बारावी, एमसीव्हीसी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, बीबीए, एमबीए, बीसीए, एमसीए, ड्रायव्हर्स अशी विविध पदे रिक्त आहेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक अ. उ. पवार यांनी ही माहिती दिली.