केबल तुटल्यामुळे पुणे शहरातील हजारो CCTV बंद; महापालिका अन् पोलिसांमध्ये टोलवाटोलवी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:58 PM2024-08-29T12:58:38+5:302024-08-29T12:59:06+5:30

शहरातील वाढती गुन्हेगारी, अपघातांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सीसीटीव्ही कार्यान्वित असणे आवश्यक

Thousands of CCTVs shut down in Pune city due to broken cable Toll settlement between pune municipality and police | केबल तुटल्यामुळे पुणे शहरातील हजारो CCTV बंद; महापालिका अन् पोलिसांमध्ये टोलवाटोलवी

केबल तुटल्यामुळे पुणे शहरातील हजारो CCTV बंद; महापालिका अन् पोलिसांमध्ये टोलवाटोलवी

पुणे: नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहराच्या विविध भागांत बसविण्यात आलेले १ हजार ०५४ सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. विशेष म्हणजे केबल तुटल्यामुळे आणि वीज पुरवठा नसल्यामुळे हे कॅमेरे बंद आहेत. या कॅमेरेचे सर्व नियंत्रण पोलिस खात्याकडे आहे. मात्र हे कॅमेरे दुरुस्त कोणी करायचे यावरून महापालिका आणि पोलिस खात्यात टोलवाटोलवी सुरू आहे.

शहरातील वाढती गुन्हेगारी, अपघातांवर लक्ष ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिस नियंत्रण कक्षाकडे सोपविण्यात आले आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाकडून शहरात २ हजार ९०९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ८५५ सीसीटीव्ही कॅमेरेच सुरू असून तब्बल १ हजार ०५४ सीसीटीव्ही कॅमेेरे बंद आहेत. मार्कटयार्ड पोलिस चौकी आणि अलंकार पोलिस चौकीच्या हद्दीतील एकही सीसीटीव्ही कॅमेरे सुरू नाही.

शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शहरातील वाढती गुन्हेगारी, अपघातांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सीसीटीव्ही कार्यान्वित असणे आवश्यक आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांची उकल होण्यासही मदत झाली आहे, पण शहरातील १ हजार ०५४ सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिस चौकीचे नाव, बंद असलेल्या सीसीटीव्हीची संख्या

संभाजी पोलिस चौकी -३०, नारायणपेठ - २७, शनिवार पेठ-३५, खडक-३९, सेनादत्त-३४, मंडई -३८, मिटगंज-१३, पेरूगेट -२६, सहकारनगर-२४, महर्षीनगर- ७१, मार्कटयार्ड-४२, वानवडी बाजार-२१, घोरपडी-९, विश्रांतवाडी-७, समर्थ पोलिस स्टेशन- १३९, गाडीतळ-१८, कसबा पेठ-३३, जनवाडी-४०, अलंकार-८, कर्वेनगर- ७१, डहाणूकर-१५, हॅपी कॉलनी-६, ताडीवाला रोड- ७०,कोंढवा- ४९,अप्पर इंदिरानगर-१००, रामोशी गेेट -२, काशेवाडी-४, पेरुगेट-२, सहकारनगर- ५, सहकारनगर तळजाई-३, पर्वती दर्शन-४, लक्ष्मीनगर - ४, वानवडी बाजार-२, तुकाई दर्शन - ६, कोरेगाव पार्क-२, विश्रांतवाडी- ४, कसबा पेठ- ८, शिवाजीनगर पोलिस स्टेशन-४, शिवाजीनगर चौकी-५, पांडवनगर-९, जनवाडी-४, कोथरूड पोलिस स्टेशन-९, कर्वेनगर-२

Web Title: Thousands of CCTVs shut down in Pune city due to broken cable Toll settlement between pune municipality and police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.