श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोर हजारो विद्यार्थीनींनी एकाच वेळी केले अथर्वशीर्ष पठण

By अजित घस्ते | Published: September 26, 2023 05:42 PM2023-09-26T17:42:40+5:302023-09-26T17:45:11+5:30

यावेळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे, गायिका आर्या आंबेकर, मधुरा रेसिपीच्या मधूरा बाछल यांची साथ मिळाली...

Thousands of students recited the Atharvashirsh simultaneously in front of Shrimant Bhausaheb Rangari Ganapati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोर हजारो विद्यार्थीनींनी एकाच वेळी केले अथर्वशीर्ष पठण

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोर हजारो विद्यार्थीनींनी एकाच वेळी केले अथर्वशीर्ष पठण

googlenewsNext

पुणे : पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत व न्याती ग्रुपच्या सहयोगाने आयोजित लोकमत ‘ती’चा गणपती बाप्पा संकल्प सिध्दीचा या उपक्रमांतर्गत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळासमोर मंगळवारी सकाळी दोन हजारो शालेय मुलीच्यावतीने अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. यावेळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे, गायिका आर्या आंबेकर, मधुरा रेसिपीच्या मधूरा बाछल यांची साथ मिळाली. 

यावेळी पुणे शहरातील सदाशिव पेठ येथील रेणूका स्वरूप शाळा, टिळक रस्ता येथील डेक्कन एज्युकेश सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, नुमवी मुलीची शाळा, ठाकरशी कन्या शाळा आदी नामवंत शाळेतील हजारो मुलींनी सहभाग घेतला.

भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळासमोर तब्बल दोन हजार मुलींनी आनंददायी वातावरणात मंगळवारी सकाळच्यावेळी अथर्वशीर्षाचे पठण करीत मनाचे श्लोक म्हंटले गेले. त्याच बरोबर लोकमत 'ती'च्या गणपतीतर्फे अभिनेत्री ऋता दुर्गुळे, गायिका आर्या आंबेकर आणि प्रसिद्ध सेफ मधुरा बाचल यांत्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मुलींनी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा मोरया जयघोष करीत या उपक्रमाचा आनंद घेतला. यावेळी शाळा आणि शाळेतील शिक्षक शिक्षिका देखील उपस्थित होत्या.

सेल्फीसाठी उंचावले हात-

या कार्यक्रमासाठी  प्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांचं  कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात  स्वागत केलं. अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थिनींनी उत्साहात हात उंचावले. तर विद्यार्थिनींनी ऋतासोबत व्यक्तिगत सेल्फी काढण्याची देखील इच्छा व्यक्त केली.

Web Title: Thousands of students recited the Atharvashirsh simultaneously in front of Shrimant Bhausaheb Rangari Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.