भोर तालुक्यात तीन हजार विद्यार्थी भीतीच्या छायेत! १३ शाळा धोकादायक; शिक्षणाचा सावळा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 02:46 AM2017-09-13T02:46:18+5:302017-09-13T02:46:18+5:30
तालुक्यातील १३ शाळा अत्यंत धोकादायक असून, सुमारे ६५ शाळांच्या दुरुस्तीची गरज आहेत. तीन हजार विद्यार्थी भीतीच्या छायेत शिक्षण घेत आहेत. अनेक शाळांना शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तर बहुतांश शाळांना शिक्षकच नाही, अशी परिस्थिती भोर तालुक्यातील असून शिक्षणाचा सावळा गोंधळ सुरू आहे.
भोर : तालुक्यातील १३ शाळा अत्यंत धोकादायक असून, सुमारे ६५ शाळांच्या दुरुस्तीची गरज आहेत. तीन हजार विद्यार्थी भीतीच्या छायेत शिक्षण घेत आहेत. अनेक शाळांना शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तर बहुतांश शाळांना शिक्षकच नाही, अशी परिस्थिती भोर तालुक्यातील असून शिक्षणाचा सावळा गोंधळ सुरू आहे.
बदली झालेल्या दुर्गम डोंगरी भागात शिक्षक जात नाहीत. पुरेशा प्रमाणात शिक्षक उपलब्ध नाहीत. अनेक शाळांचे छप्पर गळके, शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. केंद्रप्रमुख शाळांवर जात नाहीत. पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारीही नाही. त्यामुळे मुलांना अनेक अडचणींवर मात करीत शिक्षण घ्यावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने गृहिणी गावातील ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावले. अशीच अवस्था तालुक्यातील अनेक शाळांची आहे.
दुर्गम डोंगरी भागातील शाळात केंद्रप्रमुखांचे शाळांना भेट देणे, गुणवत्ता तपासणे याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे अनेक पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकल्याने त्या ८ शाळांत सुमारे तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील २ शाळा बेकायदेशीर असून त्यांना जिल्हा परिषदेची मान्यताच नाही.
जिल्हा परिषदेच्या अनेक गावांतील शाळांचा पट कमी कमी होत जाऊन अनेक शाळा एकशिक्षकी व दोन विद्यार्थी, तर काही शाळा दोन शिक्षकी व पाच-सहा विद्यार्थी असणाºया आहेत. यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर विद्यार्थी आणखी घटणार आहेत.
आठवड्यात एकदाच हजर : कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी द्या!
प्रभारी गटशिक्षणाधिकारी भोर पंचायत समितीत आठवड्यातून एकदाच हजर असतात. दोन वर्षांपासून कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नसल्याने सध्या
तिसरे प्रभारी गटशिक्षणाधिकारी कामकाज पाहत आहेत.
मात्र, ते आठवड्यातील एक दिवस मंगळवारीच भोरला हजर असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अडचणी घेऊन येणाºया नागरिकांना शिक्षण विभागात कोणीच भेटत नाहीत. त्यामुळे भोरला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी देण्याची मागणी वारवंडचे सरपंच लक्ष्मण दिघे व माजी उपसभापती भगवान कंक यांनी केली आहे.
- भोर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २७२ प्राथमिक शाळा आहेत, तर माध्यमिक शाळा ४५ असून इंग्लिश मीडियमच्या ९ शाळा आहेत. त्यातील २ बेकायदशीर आहेत.
- पहिली ते १२वीपर्र्यंत २९,६१५ विद्यार्थी
शिक्षण घेत आहेत. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या
शाळांकडे वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या टिकविण्यासाठी
शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
- खासगी अनुदानित ४५ माध्यमिक शाळा असून ५१४ शिक्षक आहेत, तर खासगी कायम विनाअनुदानित शाळा ८ (इंग्लिश मीडियम) व शिक्षक ५७ आहेत. विनाअनुदानित ३ शाळा, समाजकल्याणची १ व अदिवासी कल्याणच्या २, तर शिक्षक २७ आहेत.
- नगरपलिकेच्या ३ शाळा व १५ शिक्षक आहेत;
मात्र जिल्हा परिषेदच्या पहिली ते चौथीपर्यंत १८७
शाळा व पट ८,३६८ व ५ ते ८वीपर्यंत ८९ शाळा
आणि १,१५२ पट असून मंजूर शिक्षक ७३० तर प्रत्यक्षात ६४५ शिक्षक आहेत.