शिक्षकाला गोळ्या घालण्याची सावकारांची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 02:40 AM2018-02-02T02:40:08+5:302018-02-02T02:40:39+5:30
दौंड तालुका सावकारीच्या विळख्यात अडकल्याच्या घटना दिवसेंदिवस पुढे येत आहेत. नुकतेच पैशाच्या वादातून एका पोलीस कर्मचा-याने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता एका शिक्षकाला सावकारांनी गोळ््या घालण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
दौंड : दौंड तालुका सावकारीच्या विळख्यात अडकल्याच्या घटना दिवसेंदिवस पुढे येत आहेत. नुकतेच पैशाच्या वादातून एका पोलीस कर्मचा-याने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता एका शिक्षकाला सावकारांनी गोळ््या घालण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
आलेगाव (ता. दौंड) येथील आलेश्वर विद्यालयातील उपशिक्षक सुभाष भोसले (वय ४८) यांनी तशी तक्रार दिली आहे. यावरून दोन वेगवेगळ््या घटनेतील तीन बेकायदेशीर सावकारांना अटक करण्यात आली आहे.
विष्णू चौैघुले, युवराज बंडगर (दोघेही रा. दौैंड), नवनाथ चव्हाण (रा. खोरवडी, ता. दौैंड) या तीन खासगी सावकारांना अटक करण्यात आली आहे.
सुभाष भोसले (रा. हिंगणीबेर्डी, ता. दौैंड) या शिक्षकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की ८ जानेवारी २०१४ रोजी विष्णू चौैघुले आणि युवराज बंडगर या दोघांकडून मी १० टक्के व्याजाने ३ लाख रुपये घेतले होते.
या व्यवहारापोटी माझी वडिलोपार्जित दोन एकर जमीन साठेखत म्हणून करुन घेतली. या व्यवहारापोटी चार लाख ९० हजार रुपये व्याजापोटी दिलेले आहेत. तरीदेखील ७ लाख रुपये येणेबाकी आहे, असे विष्णू चौैघुले आणि युवराज बंडगर या सावकाराने तगादा लावला. पैैसे दे, नाहीतर गोळ््या घालीन, अशी धमकी दिली असल्याची फिर्याद सुभाष भोसले यांनी दिली आहे.
याच शिक्षकाने अन्य एक दुसरी फिर्याद दिली असून, नवनाथ चव्हाण, स्वाती चव्हाण (रा. खोरवडी,
ता. दौैंड) यांच्याकडून १० टक्के व्याजाने १ लाख रुपये घेतले होते. आजपावेतो १ लाख ६८ हजार व्याज देऊनदेखील पुन्हा माझ्याकडे तीन लाख रुपये मागतात. पैैसे दिले नाहीतर जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सावकाराला कोठडीचे आदेश
दौंड येथील खासगी सावकार आनंद जाधव (वय ४४, रा. गोवागल्ली, दौंड) याला बुधवार (दि. ३१) अटक करण्यात आली होती. त्याला दि. ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या जवळील कागदपत्रे, वह्या तसेच अन्य काही लोकांना व्याजाने पैैसे दिले आहे की नाही, याची चौैकशी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांच्या आवाहनावरून तक्रारदार येताहेत पुढे
दौैंड पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी खासगी सावकारांच्याविरोधात तक्रार करण्याचे फ्लेक्सद्वारे तसेच वर्तमानपत्रातूनही आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार सुभाष भोसले या शिक्षकाने आवाहनाला प्रतिसाद देत खासगी सावकाराच्याविरोधात तक्रार दिली असून, यासह अन्य काही नागरिक तक्रार देण्यास पुढे येतील, असे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले.