वनवैभव धोक्यात

By Admin | Published: March 28, 2016 03:24 AM2016-03-28T03:24:17+5:302016-03-28T03:24:17+5:30

शहरीकरण वाढत असताना डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे भव्य इमारतींनी वने गिळकृंत केली

The threat of vanquishment | वनवैभव धोक्यात

वनवैभव धोक्यात

googlenewsNext

पिंपरी : शहरीकरण वाढत असताना डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. त्याकडे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे भव्य इमारतींनी वने गिळकृंत केली आहेत. मावळ, मुळशी आणि खेडमधील वनवैभव धोक्यात आले आहे.
नैसर्गिक सौंदर्याचे आमिष दाखवून गृहप्रकल्प राबविणारे लोक डोंगर-दऱ्यांच्यालगत विविध प्रकारच्या सिटी विकसित करीत आहेत. नवीन पर्यटनस्थळ विकसित केली जात असल्यामुळे वनांचे सौंदर्य नष्ट होऊ लागले आहे. पिंपरी-चिंचवड या शहराच्या परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर वनवैभव होते. आता वृक्षांचे प्रमाण कमी झाले आहे. मावळ-मुळशीत वनवैभव दिसून येते. एकूण ३० हजार हेक्टर भाग वनाने व्यापलेला आहे. यातील काही भाग आंबेगाव व खेडचा आहे. मात्र, या भागात नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे वनविभागातील अतिक्रमण हटविण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे. झोपड्या हटविणे एक डोकेदुखी झली आहे. पोलिसी कुमक मागविण्याशिवाय वन विभागसमोर पर्याय नाही.
वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर
वनसंपदेतील जैववैविध्य यामुळेच नष्ट होत गेले आहे. नवीन प्रजाती उत्पन्न होणे बंद झाले आहे. जंगलातील प्रजातींचे संवर्धन होणे ही एक मोठी जबाबदारी वन विभागावर आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक आहे.
वनांतील त्रिफळा, बेहडा, हिरडा
अशा आयुर्वेदिक औषधी
वनस्पतींचा उपयोग केला जात आहे. आजही वटवाघूळ, साळविंदर यांची शिकार होत आहे. जंगलाच्या असुरक्षिततेत वाढ होत चालली
आहे, हे यातून निदर्शनास आले
आहे. जमिनीची धूप व पाण्याची
गरज भागविण्याचे काम जंगल
करीत आहेत. वनांच्या जनजागृतीची गरज आहे. (वार्ताहर)

वृक्षारोपण कागदावरच : महापालिकेचे दुर्लक्ष
माजी आयुक्त हरनामसिंग यांच्या कालावधीत शहरातील विविध भागांत ५५ हजार वृक्षांचे रोपण केले होते. त्यामुळे भोसरी भागात मोठे वृक्ष दिसून येत आहेत. १९८२ नंतर झाडांच्या प्रमाणात वाढ झालीच नाही. वृक्ष प्राधिकरण समिती, शहरातील विविध पर्यावरण समित्यांनी वृक्ष लागवडीसाठी कसोशीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. वनांची जनजागृती व विकास या दृष्टीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. हरनामसिंग यांच्या क ालावधीत वनांचा विकास झाला, त्यानंतर आजतागायत झाडे विकसित झाली नाहीत. त्या काळात कमी पावसावरही दीर्घायुषी झाडे लावली गेली व ती झाडे जगली आहेत.

शहरी भागातील वनराई झाली लुप्त
महानगरपालिकेत प्रथम १४ गावे समाविष्ट झाली. विकासाच्या दृष्टीने गावांचा विकास होत गेला. मात्र, यामुळे जंगलाचे प्रमाणही तेवढेच कमी झाले व पर्जन्यवृष्टीचे प्रमाणही घटले. यामुळे ग्रामीण भागांवर शहर विकासाचे अतिक्रमण होणे, ही तितके च धोकादायक झाले आहे. शहरात रावेत, थेरगाव, भेगडेवाडी, वाल्हेकरवाडी, किवळे, चऱ्होली, तळवडे या भागात झाडांचे प्रमाण अधिक होते. आता फक्त दुर्गाटेकडीच्या भागातच वनवैभव दिसून येत आहे.

मावळ-मुळशी भागात डोंगराळ जमीन जास्त आहे. या भागात वाहून जाणारी माती दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे. मात्र, नव्याने जास्त लागवड न होणारी जमीन उरलेली नाही. यासाठी जल व माती संवर्धन करणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियान व्यापक स्वरूपात राबविणे आवश्यक आहे. अतिक्रमणप्रवण क्षेत्रातही वाढ होत चालली आहे. यालाही आळा घालणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरण समित्यांनी व्यक्त केले आहे. शहराचा विकास झाला, तसा वनांचा विकास होत नाही. आज वनांवर स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. चोरट्या वृक्षतोडीवर वचक निर्माण झाला आहे. अवैध वृक्षतोड थांबली आहे.
- सचिन डोंबाळे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ

Web Title: The threat of vanquishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.