‘जलसंपदा’ची पाणी तोडण्याची धमकी

By admin | Published: April 1, 2017 02:41 AM2017-04-01T02:41:55+5:302017-04-01T02:41:55+5:30

महापालिकेकडून ७३ लाख रुपयांचे बिल राहिल्याने शहराचे पाणी तोडण्याची धमकी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी

The threat of water resources' water cut | ‘जलसंपदा’ची पाणी तोडण्याची धमकी

‘जलसंपदा’ची पाणी तोडण्याची धमकी

Next

पुणे : महापालिकेकडून ७३ लाख रुपयांचे बिल राहिल्याने शहराचे पाणी तोडण्याची धमकी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. मात्र वरिष्ठ पातळीवरून याप्रकरणी हस्तक्षेप झाल्याने रात्री उशीरा यावर पडदा पडला.
महापालिकेकडून जलसंपदा विभागाला साडेतीन कोटी आणि ७७ लाख अशी दोन बिले द्यायची होती. त्यापैकी, साडेतीन कोटी रु पयांच्या बिलाचा चेक दिला. मात्र, त्यांनी चेक घेण्यास नकार देऊन त्यानुसार रोख पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर पालिकेने आरटीजीएसच्या माध्यमातून संबंधित रक्कम जलसंपदा विभागाच्या खात्यात जमा केली. मात्र ७३ लाखांचे बिलही सायंकाळपूर्वीच द्या, असा हेका अधिकाऱ्यांनी लावला. या बिलाची प्रशासकीय मान्यताही अद्याप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे ती रक्कम देता आली नाही. त्यावेळी शहराचा शनिवारी पाणीपुरवठा तोडण्याची धमकी त्या अधिकाऱ्याने दिली. त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकारावर पडदा पडला.
काही मिहन्यांपूर्वीच महापालिका अधिक पाणी वापरत असल्याचा दावा करत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याने पार्वतीचा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पुढे चार ते पाच दिवस विस्कळित झाला होता.
विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले होते. आता, पुन्हा जलसंपदा विभागाने बिलाच्या रकमेची पूर्तता केली नाही म्हणून पाणी तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे जलसंपदा विभागाच्या अखत्यारित येत असून, त्याचे शुल्क पालिकेतर्फे भरण्यात येते.

Web Title: The threat of water resources' water cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.