राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सोशल मीडियाच्या बनावट अकाऊंटवर आक्षेपार्ह लिखाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 07:47 PM2021-04-29T19:47:16+5:302021-04-29T19:47:49+5:30

२६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल....

Threatened to kill NCP president Sharad Pawar; Offensive writing on a fake social media account | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सोशल मीडियाच्या बनावट अकाऊंटवर आक्षेपार्ह लिखाण 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; सोशल मीडियाच्या बनावट अकाऊंटवर आक्षेपार्ह लिखाण 

Next

पिंपरी : सोशल मीडियावरील बनावट अकाउंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी २६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ मार्च ते ७ एप्रिल २०२१ या कालावधीत घडला आहे.

राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे (वय ३४, रा. पिंपळे निलख, पुणे) यांनी फिर्याद दिल्यानुसार याप्रकरणी नोडल सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा पिंपरी -चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. 
फेसबुक पेज सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब पोस्टेड बाय धनंजय जोशी, राजकारण महाराष्ट्राचे पोस्टेड बाय अतुल अयचित, राजकारण महाराष्ट्राचे पोस्टेड बाय सोनाली राणे, भाजप सोशल मीडिया वॉर रूम महाराष्ट्र पोस्टेड बाय मधुकर वाघमारे, टकलु हैवान, देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेज चालवणाऱ्या व्यक्ती तसेच फेसबुक अकाऊटधारक राजेंद्र पवार, गिरीश गणू, सिद्धार्थ जोशी, विश्वम्बर देव, गोविंद कुलकर्णी, धनंजय जोशी, महेश गबुडले, विक्रांत एस. जोशी, नाना पंडीत, राम शिंदे पाटील, शशिकांत आहिरे, राधा माने, सोनाली राणे, भानू बोराडे, सचिन दाभाडे पाटील, श्रीकांत पाटील, नितीन मताले, दयानंद पाटील, अजय राठोड आणि ट्विटर अकाउंट धारक रुद्र देव, विमुक्त आदींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट फेसबुक पेज, फेसबुक अकाउंट, ट्विटर अकाउंट या सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह, हिणकस, विकृत, बदनामीकारक लिखाण केले. तसेच सोशल मीडियावरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Threatened to kill NCP president Sharad Pawar; Offensive writing on a fake social media account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.