Pune: बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: January 24, 2024 13:47 IST2024-01-24T13:46:49+5:302024-01-24T13:47:30+5:30
हा प्रकार चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेच्या घरी ऑगस्ट २०२३ ते २३ जानेवारी पर्यंतच्या काळात घडला आहे....

Pune: बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल
पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन एका विवाहित महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच मुलाच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेच्या घरी ऑगस्ट २०२३ ते २३ जानेवारी पर्यंतच्या काळात घडला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि. २३) चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अजय नागटिळक (वय अंदाजे ३० ते ३५, रा. इंदिरा वसाहत, गणेश खिंड रोड, औंध) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या ओळखीचा आहे. आरोपी अजय याने फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांच्या पतीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर आरोपीने महिलेला ‘तु मला आवडतेस माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेव नाहीतर मी तुझी बदनामी करेल’ अशी धमकी दिली. तसेच पतीला खोटे सांगून मुलाच्या जिवाचे बरे वाईट करेन असे मेसेज महिलेच्या मोबाईलवर केले.
याबाबत महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर विनयभंग व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शानमे करत आहेत.