मुलांना उचलून नेण्याची धमकी; व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल, भवानी पेठेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 09:49 AM2024-11-25T09:49:06+5:302024-11-25T09:49:30+5:30
मालाचे पैसे द्यावेत म्हणून व्यावसायिकाकडे देणेकरांनी तदागा लावला होता
पुणे : पावसाळ्यात आलेल्या पुराने ताडीवाला रोड येथील गोदामात पाणी शिरल्याने मालाचे नुकसान झाले. त्या मालाचे पैसे द्यावेत म्हणून व्यावसायिकाकडे देणेकरांनी तदागा लावला. व्यावसायिकाच्या मुलाला उचलून नेण्याची धमकी दिली. या मानसिक त्रासामुळे एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
राजा परदेशी (४४, रा. महाराष्ट्र तरुण मंडळाशेजारी, हरकानगर, काशेवाडी, भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) दुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी त्यांची पत्नी कंचन राजा परदेशी (३८, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी लक्कडसिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश विटे करत आहेत.