Pune | बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला १७ लाखांना लुबाडणाऱ्या वकिलाला अटक

By विवेक भुसे | Published: March 30, 2023 04:51 PM2023-03-30T16:51:16+5:302023-03-30T16:51:47+5:30

लाखो रुपये लुबाडणाऱ्या वकिलाला हडपसर पोलिसांनी अटक केली....

Threatening to file a case of molestation arrested a lawyer who robbed a businessman of 17 lakhs | Pune | बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला १७ लाखांना लुबाडणाऱ्या वकिलाला अटक

Pune | बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला १७ लाखांना लुबाडणाऱ्या वकिलाला अटक

googlenewsNext

पुणे : बिझनेसबाबत बोलायचे आहे, असे सांगून फ्लॅटवर नेऊन एका तरुणीने त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्या व्यावसायिकाला बलात्काराची केस करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून १७ लाख ५० हजार रुपये लुबाडणाऱ्या वकिलाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

विक्रम भाटे (वय ३५, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. निधी दीक्षित (वय २५, रा. वाघोली) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मगरपट्टा सिटी येथील एका ४२ वर्षांच्या व्यावसायिकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सीजन मॉल, निधी दीक्षित हिच्या घरी आणि विक्रम भाटे याच्या कार्यालयात दि. ३ ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत सुरू होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. ते ३ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांचा मित्र व त्याची मैत्रीण यांच्याबरोबर सीजन मॉल येथील प्लॉयहाय रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी निधी दीक्षित हिने ओळख करुन घेऊन त्यांचा मोबाइल नंबर घेतला. त्यानंतर तिने व्हॉट्सॲप कॉलवर फिर्यादी यांच्याशी बोलणे सुरू केले. ७ नोव्हेबर रोजी तिने बिझनेसबाबत बोलायचे आहे, असे म्हणून तिच्या वाघोलीतील फ्लॅटवर नेले. तेथे ती बेडरुममध्ये गेली व पारदर्शक नाईट ड्रेस घालून बाहेर आली. फिर्यादी यांच्या शेजारी बसून तिने ४-५ क्लोज सेल्फी काढले.

त्यानंतर दि. १५ नोव्हेबर रोजी निशा गुप्ता हिच्या फोनवरून तिचा वकील विक्रम भाटे याने फोन केला. निधी दीक्षित तुमच्यावर अशी तक्रार केली आहे की त्यामध्ये तुम्हाला बेल मिळणार नाही. हे प्रकरण मिटवायचे असेल तर मला सांगा मी तुम्हाला मदत करतो. तुमची केस मिटून टाकतो, असे सांगून त्यांच्याकडे आठ लाखांची मागणी केली. त्यांनी दागिने गहाण ठेवून पैसे दिले. त्यानंतर विक्रम भाटी याने वेळोवेळी त्यांना धमकावून अगदी सर्वाेच्च न्यायालयातही जामीन मिळणार नाही, असे सांगून त्यांना लुबाडत राहिला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी विक्रम भाटे याला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.

Web Title: Threatening to file a case of molestation arrested a lawyer who robbed a businessman of 17 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.