लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार अन् बदनामी करण्याची धमकी

By नितीश गोवंडे | Published: June 6, 2024 05:53 PM2024-06-06T17:53:59+5:302024-06-06T17:54:51+5:30

आरोपीने तरुणीला विश्वासात घेऊन लग्न करण्याचे आश्वासन दिले, नंतर मात्र पुन्हा लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली

Threatening to molesed and defame the young woman by luring her into marriage | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार अन् बदनामी करण्याची धमकी

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार अन् बदनामी करण्याची धमकी

पुणे : तरुणीसोबत ओळख करुन तिच्यासोबत मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यावर बदनामी करण्याची धमकी देऊन लग्नास नकार दिला. यामुळे पीडितेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

२८ वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. ५) येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रणय दिलीप जाधव (२८, रा. नागपुर चाळ, येरवडा) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ ते ५ जून २०२४ या कालवधीत येरवडा परिसरात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी २०१५ मध्ये येरवडा परिसरात राहण्यास गेली. २०१८ मधील गणपती उत्सवादरम्यान फिर्यादी यांची आरोपीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर प्रेमात झाले. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच घरात एकटी असताना आरोपीने घरी येऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलीने प्रणय याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने तिला धमकावले. ‘मी न्युज पेपरमध्ये नोकरीला आहे, तु वेश्या व्यवसाय करते, तुझी बातमी छापून बदनामी करेल, मग बघ तुझ्यासोबत कोण लग्न करेल’, अशी धमकी दिली. त्यानंतर प्रणय याने फिर्यादी यांना विश्वासात घेऊन लग्न करण्याचे आश्वासन दिले. यानंतर मात्र त्याने पुन्हा लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत.

Web Title: Threatening to molesed and defame the young woman by luring her into marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.