Pune Crime | शारीरिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 06:01 PM2023-03-06T18:01:39+5:302023-03-06T18:05:02+5:30

कोल्ड्रिंग्स मधून गुंगीचे औषध देऊन मित्राला शारीरिक संबंध करायला सांगून त्याचे व्हिडीओ काढले...

Threats to make personal videos go viral; Filed a case pune crime | Pune Crime | शारीरिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; गुन्हा दाखल

Pune Crime | शारीरिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : तरुणीशी जवळीक साधून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. कोल्ड्रिंग्स मधून गुंगीचे औषध देऊन मित्राला शारीरिक संबंध करायला सांगून त्याचे व्हिडीओ काढले. त्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका २२ वर्षांच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सागर दिलीप काकडे (वय ३८ रा. सोमाटणे फाटा,तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे. तिचा मित्र मयूर साळवे (रा. लोणावळा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आंबेगाव पठार, सोमाटणे फाटा, वाकड येथे मागील दाेन वर्षांदरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी सागर काकडे याने फिर्यादी यांच्याबरोबर ओळख करून घेतली. फिर्यादी यांच्या घरची हलाखीच्या परिस्थितीची माहिती घेऊन त्यांच्याशी जवळीक साधली. फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर एकदा फिर्यादी यांचा मित्र मयूर साळवे याच्याशी मोबाइलवरून बोलत असल्याचे भासवून त्याला व फिर्यादी यांना सागर याने लॉजवर नेले. तेथे सागर याने फिर्यादी यांना कोल्ड्रिंग्स मधून काहीतरी दिले. त्यामुळे फिर्यादी यांना गुंगी आली.

त्यानंतर त्याचा मित्र मयूर याला फिर्यादीसोबत शारीरिक संबंध करावयास लावले. सागर याने जबरदस्तीने शारीरिक संबंध करीत असतानाचा व्हिडीओ तयार केला. त्याचबराेबर गुंगीतील अवस्थेत फिर्यादींना दारू पाजून त्यांचे नग्न अवस्थेतील व्हिडीओ काढले. त्यानंतर हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक घोगरे तपास करीत आहेत.

Web Title: Threats to make personal videos go viral; Filed a case pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.