सिलेंडर एजन्सी देतो सांगून फळविक्रेत्याला साडेतीन लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: December 24, 2023 17:43 IST2023-12-24T17:43:15+5:302023-12-24T17:43:42+5:30
अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

सिलेंडर एजन्सी देतो सांगून फळविक्रेत्याला साडेतीन लाखांचा गंडा
पुणे: एका नामांकित सिलेंडर कंपनीचा हेड बोलत असल्याचे सांगून एका फळविक्रेत्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ५ सप्टेंबर २०२३ ते १३ सप्टेंबर २०२३ यादरम्यान घडला आहे. फिर्यादी घरी असताना त्यांना रात्रीच्या सुमारास अनोळखी क्रमांकावरून फोन आला. सिलेंडर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून आम्ही एजन्सी साठी जागा शोधत असल्याचे सांगितले. फिर्यादींनी त्यांची स्वतःची जमीन असल्याचे सांगून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जमिनीचे पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन करून तुमची जागा आम्हाला आवडली असून तुमच्या जागेचे व्हेरीफिकेशनसुद्धा झाले आहे असे सांगितले. बनावट कागदपत्रे पाठवून फिर्यादींचा विश्वास संपादन लायसन्ससाठी पैसे भरावे लागतील असे सांगून फिर्यादींकडून ३ लाख ५७ हजार रुपये उकळले. अधिक माहिती घेतली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादींनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे पुढील तपास करत आहेत.