नेत्रतपासणी शिबिरात साडेतीनशे लोकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:12 AM2021-08-19T04:12:34+5:302021-08-19T04:12:34+5:30
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबलू ढोकले यांच्या प्रयत्नाने मोफत मोतीबिंदू ...
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबलू ढोकले यांच्या प्रयत्नाने मोफत मोतीबिंदू भिंग रोपण शस्त्रक्रिया शिबिर, डोळे तपासणी, अल्पदरात चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या शिबिराचा सुमारे ३४३ जणांनी लाभ घेतला व त्यातील ४१ जणांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, ११० जणांना अल्पदरात चष्मे देण्यात येणार आहेत. या वेळी रोटरी क्लबच्या रूपाली पवार, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दरेकर, पांडुरंग ढोकले, संदीप ढोकले, नितीन ढोकले, अंकुश पंचमुख, शोभा दरेकर, सुनीता ढोकले, सोनाली ढोकले, रेखा खेडकर, उज्वला नप्ते, ग्राम विकास अधिकारी दिलीप पानसरे उपस्थित होते.
१८ केंदूर
करंदी येथील नेत्र शिबिरात सहभागी झालेले ग्रामस्थ.