जेजुरीतील मार्तंड कोविड सेंटरला साडेतीन लाखांची औषधे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:04+5:302021-05-20T04:11:04+5:30

बुधवारी (दि.१९) संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष तथा देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप यांचा मित्रपरिवार व बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष -उद्योजक ...

Three and a half lakh medicines donated to Martand Kovid Center in Jejuri | जेजुरीतील मार्तंड कोविड सेंटरला साडेतीन लाखांची औषधे भेट

जेजुरीतील मार्तंड कोविड सेंटरला साडेतीन लाखांची औषधे भेट

Next

बुधवारी (दि.१९) संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष तथा देवसंस्थानचे विश्वस्त संदीप जगताप यांचा मित्रपरिवार व बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष -उद्योजक मोहन भोसले, करण जगताप, मोहन चौधरी, शिवाजी जगताप, अक्षय जगताप, सत्यवान चाचर, अजय जगताप, डॉ. विनोदकुमार सिंह आदींनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सुमारे ३ लाख ५० हजारांची ौषधे कोविड सेंटरमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. महेश मसराम यांच्या स्वाधीन केली.

यावेळी विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील, देवसंस्थान मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप व आरोग्य विभाग, देवसंस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. महेश मसराम म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र आहे. त्यामुळे औषधोपचार व रुग्णांना देणाऱ्या डोसमध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने डॉक्सिसायक्लिन १०० एमजी, आयकटर मेटिन १२ एमजी यांचा चांगला परिणाम रुग्णांना उपचार करताना दिसून येत आहे. सोबत टॅबलेट व्हिटॅमिन सी व झिंक हे औषध रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आज जी औषधे उद्योजकांनी उपलब्ध करून दिलेली आहेत ती मोलाची आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

१९ जेजुरी

संभाजी ब्रिगेडचे आणि उद्योजक यांच्या वतीने कोविड सेंटरला औषधे भेट देताना मान्यवर.

Web Title: Three and a half lakh medicines donated to Martand Kovid Center in Jejuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.