साडेतीन लाख वीजबिले भरली आॅनलाईन

By Admin | Published: January 18, 2017 01:32 AM2017-01-18T01:32:54+5:302017-01-18T01:32:54+5:30

बारामती परिमंडलातील ३ लाख ४३ हजार ग्राहकांनी मावळत्या वर्षात वीजबिलांपोटी २०० कोटी १५ लाख रुपयांचा ‘आॅनलाईन’ भरणा केला

Three and a half million electricity billboards filled online | साडेतीन लाख वीजबिले भरली आॅनलाईन

साडेतीन लाख वीजबिले भरली आॅनलाईन

googlenewsNext


बारामती : बारामती परिमंडलातील ३ लाख ४३ हजार ग्राहकांनी मावळत्या वर्षात वीजबिलांपोटी २०० कोटी १५ लाख रुपयांचा ‘आॅनलाईन’ भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिले ‘आॅनलाईन’ भरण्यास ग्राहकांचा कल वाढत असल्याची स्थिती आहे.
महावितरणने इंटरनेटद्वारे ‘आॅनलाईन’ बिल पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहणे आणि भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.
२०१६ मध्ये बारामती परिमंडलात ३ लाख ४३ हजार १९१ वीजग्राहकांनी २०० कोटी १५ लाख रुपयांच्या वीजबिलांचे ‘आॅनलाईन’ पेमेंट केले आहे. बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ५८ हजार ५५४ ग्राहकांनी ५२ कोटी ७२ लाख, सोलापूर मंडलातील ८८ हजार ४९९ ग्राहकांनी ६७ कोटी ३४ लाख, तर सातारा मंडलातील १ लाख ९६ हजार १३८ ग्राहकांनी ८० कोटी ९ लाख रुपयांची वीजबिले ‘आॅनलाईन’ भरली आहेत. २०१५ मध्ये बारामती परिमंडलात १२८ कोटी ८० लाख रुपयांच्या वीजबिलांचे ‘आॅनलाईन’ पेमेंट केले होते. बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ३८ हजार ५५५ ग्राहकांनी ३४ कोटी ८१ लाख, सोलापूर मंडलातील ६४ हजार ५७२ ग्राहकांनी ४४ कोटी ४७ लाख, तर सातारा मंडलातील ९९ हजार ८८७ ग्राहकांनी ४९ कोटी ५२ लाख रुपयांची वीजबिले ‘आॅनलाईन’ भरली होती.
>महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ‘आॅनलाईन’ भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी ‘गो-ग्रीन’ संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे.
तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह वीजबिल ‘आॅनलाईन’ भरण्याची सोय उपलब्ध आहे.

Web Title: Three and a half million electricity billboards filled online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.