कुकडी प्रकल्पातून सोडणार साडेतीन टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:08+5:302021-05-24T04:09:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडगाव कांदळी: कुकडी प्रकल्पातून येते २८ दिवस उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या येडगाव धरणाच्या डाव्या ...

Three and a half TMC of water will be released from the poultry project | कुकडी प्रकल्पातून सोडणार साडेतीन टीएमसी पाणी

कुकडी प्रकल्पातून सोडणार साडेतीन टीएमसी पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वडगाव कांदळी: कुकडी प्रकल्पातून येते २८ दिवस उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यातून १ हजार ४०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. कुकडी डावा कालवा हा २४९ किलोमीटर लांबीचा असून, या पाण्याचा लाभ जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पाच तालुक्यांना होणार आहे. टेल टू हेड या पद्धतीने पाणीवाटप केले जाणार आहे.

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणातून १ हजार क्‍युसेकने, डिंभे धरणातून ६०० क्‍युसेकने, पिंपळगाव जोगा धरणातून १ हजार १०० क्‍युसेकने, चिल्हेवाडी धरणातून २३० क्‍युसेकने येडगाव धरणात असे एकूण २ हजार ९३० क्‍युसेकने पाणी जमा होत आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा जमा झाल्याने जलविद्युत विमोचनातून शुक्रवारी (दि. २१) १४०० क्‍युसेकने डाव्या कालव्यात पाणी सोडले आहे. त्यामुळे येथे दररोज सुमारे ३० हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीत )व कंसात टक्केवारी

येडगाव १.०२८ (५२.८९ टक्के)

माणिकडोह ०.५२३ (५.१४ टक्के )

वडज ०.२९४ ( २५.०७टक्के)

डिंभे ४.२०० (३३.६२ टक्के)

पिंपळगाव जोगे ०. (० टक्के)

३.५७४ मृतसाठा

चौकट

नदीवरील बंधाऱ्यांनाही आले पाणी

कुकडी नदीवरील वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील बंधारे पाण्याअभावी कोरडे पडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पाटबंधारे विभागाने कालव्याबरोबर कुकडी नदीवरील बंधाऱ्यातही पाणी सोडले आहे. या पाण्याअभावी बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरू होणार आहे.

चौकट

शेतकऱ्यांना दिलासा

कुकडी डाव्या कालव्याला पाणी सुटावे यासाठी जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या पाचही तालुक्यांतील शेतकरी पाण्याची वाट पाहत होते. विहिरींची पाणीपातळी कमी झाल्याने शेती सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे.

चौकट

दररोज ३० हजार युनिट वीजनिर्मिती

कुकडी डाव्या कालव्याला येडगाव (ता. जुन्नर) येथून जलविद्युत विमोचकातून १४०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा लाभ असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांना होणार आहे. याबरोबरच दररोज ३० हजार युनिट वीज निर्मिती होणार आहे.

कोट

२८ दिवसांत कुकडी डाव्या कालव्यातून साडेतीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार

आहे. याचा लाभ पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्‍यासाठी डिंभे उजव्या कालव्यात १५० क्‍युसेकने पाणी सोडले आहे. पाणीटंचाईचा विचार करता काटेकोर नियोजन करण्यता आले आहे.

- प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १.

Web Title: Three and a half TMC of water will be released from the poultry project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.