स्पा सेंटरला खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:43+5:302021-01-19T04:14:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तुम्हाला स्पा सेंटर चालवायचे असेल तर आम्हाला दरमहा १५ हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. ...

Three arrested for demanding ransom at spa center | स्पा सेंटरला खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

स्पा सेंटरला खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तुम्हाला स्पा सेंटर चालवायचे असेल तर आम्हाला दरमहा १५ हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. नाही तर दंडुकीधारी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी देणार्या तिघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी सापळा लावून अटक केली.

विशाल कचरु पायाळ (वय २८, रा. कदम वाक वस्ती, लोणी काळभोर), सनी तानाजी ताकपेरे (वय २७, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशाल पायाळ हा पोलीस प्रवाह न्युजचा पत्रकार असल्याचे सांगत आहे. त्यांचा साथीदार पंकेश राजू जाधव यालाही अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी मंगेश डोंगरखोस (वय ३१, रा. पिंगळे वस्ती, मुंढवा) यांनी काेरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मंगेश हे कोरेगाव पार्कमधील स्काइन स्पा सेंटर येथे मॅनेजर म्हणून काम पाहतात. स्पा सेंटरच्या मालकीन नुतन धवन (रा. केशवनगर, मुंढवा) या असून १६ जानेवारी रोजी त्यांच्या स्पामध्ये दोघे जण आले व त्यांनी स्काइन स्पा चालू ठेवायचा असेल तर दरमहा १५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. तेव्हा धवन यांनी त्याला नकार दिला. त्याने माझे परवानगीशिवाय स्पा चालू ठेवता येणार नाही. तुम्हाला दरमहा १५ हजार रुपये द्यावेच लागतील. अन्यथा त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. दंडुकीधारी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी दिली. सोमवारी त्याने फोन करुन आज दुपारी पैसे घेण्यासाठी येतो, असे सांगितले. या प्रकाराची त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी तातडीने इतर अधिकारी, पंचांना बोलावून स्काइन स्पा येथे सापळा रचला. विशाल पायाळ व सनी ताकपेरे तेथे आले. मंगेश यांच्याकडून १५ हजार रुपयांचा हप्ता घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सहायक आयुक्त चंद्रकांत सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, रुपेश चाळके, दिनेश शिंदे, अमोल सोनावणे, राजेश पवार, निशिकांत सावंत, संदीप गर्जे, गणेश गायकवाड, तुकाराम शिंदे, सचिन वाघमोरे, प्रकाश लंगे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Three arrested for demanding ransom at spa center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.