पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या तिघांना अटक; पब मालकासह बड्या बुकींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 12:21 PM2023-05-22T12:21:20+5:302023-05-22T12:21:36+5:30

ही कारवाई कोंढव्यातील साईबाबानगर येथील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत शनिवारी सायंकाळी करण्यात आली....

Three arrested for betting on IPL in Pune; Including the big bookies including the pub owner | पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या तिघांना अटक; पब मालकासह बड्या बुकींचा समावेश

पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या तिघांना अटक; पब मालकासह बड्या बुकींचा समावेश

googlenewsNext

पुणे : आयपीएलमध्ये चेन्नई विरुद्ध दिल्ली या सामन्यावर सट्टा घेणाऱ्यावर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने छापा टाकून तिघांना अटक केली आहे. वसीम हनीफ शेख (वय ३९, कोंढवा खुर्द), इक्रामा मकसुद मुल्ला (वय २६, घोरपडी पेठ) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब (वय ३५, सोमवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जितेश मेहता (रा. पुणे) व अक्षय तिवारी (रा. इंदोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस नाईक शंकर संपते यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई कोंढव्यातील साईबाबानगर येथील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत शनिवारी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणीविरोधी पथकातील पोलिस अंमलदार सुधीर इंगळे आणि शंकर संपते यांना काही बुकी हे कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार खंडणीविरोधी पथक कोंढव्यातील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत पोहाेचले. पोलिसांनी तेथे असलेल्या तिघांना पकडले. त्यांच्याकडून पाच मोबाइल, लॅपटॉप व एक डायरी असा एक लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यातील माहितीनुसार, त्यांनी यापूर्वीही आयपीएल २०२३ मधील सामन्यांवर सट्टा घेतलेले व खेळलेले दिसून आले आहे. त्यांच्याबरोबर जितेश मेहता आणि इंदौर येथील अक्षय तिवारी यांच्याशी संगनमत करून हा सर्व प्रकार सुरू होता. जितेश मेहता याचा कोरेगाव पार्कमध्ये पब आहे. तर अक्षय तिवारी हा मध्य प्रदेशातील मोठा बुकी असल्याचे सांगितले जाते. पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Three arrested for betting on IPL in Pune; Including the big bookies including the pub owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.