विनयभंगप्रकरणी तिघांना अटक
By admin | Published: October 11, 2016 01:52 AM2016-10-11T01:52:10+5:302016-10-11T01:52:10+5:30
वडगाव निंबाळकर येथील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर येथील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (दि. ८) त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अजित गजानन सुतार, सलीम शफीक भालदार, विनायक अनिल गायकवाड (सर्व रा. वडगाव निंबाळकर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे
आहेत. वडगाव निंबाळकर येथील नीरा डावा कालव्यालगतच्या परिसरात गुरुवारी (दि. ६) तीन तरुणांनी शालेय मुलींचा पाठलाग करून, त्यांची छेड काढली. याबाबत पालकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली; परंतु पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याने ग्रामस्थांमधून असंतोष वाढला होता. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या आदेशाने बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी पालकांची बाजू ऐकून तक्रारीनुसार तरुणांवर बाललैंगिक अत्याचार व विनयभंगाचा बारामती शहर पोलीस ठाण्यात
गुन्हा नोंदविला होता.
छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)