मेहुणीच्या खूनप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2016 03:49 AM2016-03-25T03:49:06+5:302016-03-25T03:49:06+5:30

सासऱ्याची २० एकर जमीन मिळवण्यासाठी मेहुणीचा खून करून सासऱ्यावर वार करून त्याच्याही खुनाचा प्रयत्न करणाऱ्या जावयासह तिघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे

Three arrested in the murder of sister-in-law | मेहुणीच्या खूनप्रकरणी तिघांना अटक

मेहुणीच्या खूनप्रकरणी तिघांना अटक

Next

पुणे/बारामती : सासऱ्याची २० एकर जमीन मिळवण्यासाठी मेहुणीचा खून करून सासऱ्यावर वार करून त्याच्याही खुनाचा प्रयत्न करणाऱ्या जावयासह तिघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी दिली.
विशाल सोपान वत्रे (वय २४, रा. घर नं. ७६५, गावठाण मंचरवाडी, ता. दौंड), जयदीप चव्हाण (वय २९, रा. येडेवाडी, लिंगआळी, ता. दौंड) आणि केरबा मेरगळ (वय २७, रा. मसणरवाडी, मेरगळमळा, ता. दौंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी शीतल बाराते (वय २४) खून केला होता, तर रमेश बाराते (वय ४५, रा. बाबुर्डी, ता. बारामती) यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. मात्र ते बचावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल हा रमेश बाराते यांचा जावई आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचा तो नवरा आहे. तर दुसरी मुलगी शितल मध्यप्रदेशामधील एका डेंटर कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाला शिकत होती. त्यांच्या नावावर २० एकर जमीन आहे. ही जमीन मिळवण्यासाठी विशालने मेरगळ आणि चव्हाणच्या मदतीने खून केला. त्यासाठी ४० हजार रुपये दिले. यापुर्वी शीतल ही एकदा मैत्रीणीसह रेल्वेतुन प्रवास कर खून करण्याचा प्रयत्न विशालने केला होता. मात्र शितलची मैत्रीण सोबत असल्याने त्याचा डाव फसला होता. पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरीक्त अधिक्षक तानाजी चिखले, राजेंद्र मोरे यांच्यासह एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक राम जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक निरीक्षक आर. एन. रामाघरे, उपनिरीक्षक अंकुश माने आणि पोलिस पथकाने आरोपींना सापळा रचुन अटक केली.

बाराते मंगळवारी दुपारी चार ते पाचच्या दरम्यान शितलसह मोटारसायकलवरून हिंगणीगाडा ते सुपे रोडने जात होते. आरोपींनी त्यांना गाठत धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये शितलचा जागीच मृत्यू झाला. तर बाराते गंभीर जखमी झाले.
हल्ला हा चोरीच्या उद्देशाने केला असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी मिरची पुड टाकण्यात आली होती. विशाल वत्रेने त्याने केलेल्या गुन्हयाची कबुली दिली असून त्याला पुढील तपासासाठी यवत पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

Web Title: Three arrested in the murder of sister-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.