नीरा गोळीबारप्रकरणी तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:06+5:302021-07-22T04:09:06+5:30
गोट्या निखिल रवींद्र डावरे (वय २४), संकेत ऊर्फ गोट्या सुरेश कदम (वय २५), गणेश लक्ष्मण जाधव (रा. नीरा, ता. ...
गोट्या निखिल रवींद्र डावरे (वय २४), संकेत ऊर्फ गोट्या सुरेश कदम (वय २५), गणेश लक्ष्मण जाधव (रा. नीरा, ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील डावरे याला जेजुरी पोलिसांनी सोमवारी रात्री तर, संकेत कदम आणि गणेश जाधव यांना जेजुरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली.
नीरा (ता. पुरंदर) येथील कुविख्यात गुंड गणेश रासकर याच्यावर शुक्रवार (दि.१६) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास गोळीबार झाला. जवळच्याच दोन मित्रांनी गोळीबारात प्रत्यक्षात सभाग घेतला होता. मात्र, यामागे अनेक सूत्रधार असण्याची शक्यता लक्षात घेत जेजुरी पोलीस सखोल तपास करत आहेत. प्रत्यक्ष घटनेवेळी गोळीबार करणाऱ्या संशयिताला दुचाकीवरून पळवून नेणाऱ्या पाडेगाव (ता. खंडाळा, सातारा) येथील निखिल उर्फ गोट्या रवींद्र ढावरे याला त्याच्या घरातून सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. गोळीबार करण्यासाठी वापरलेले हत्यार काय असेल व ते कोठून आले, याचा तपास पोलीस घेत होते. आरोपी ढावरे याने पिस्टल व चार राऊंड लोणी (ता. खंडाळा, सातारा) येथील संकेत ऊर्फ गोट्या सुरेश कदम याच्याकडून घेतल्याचे कबूल केले. मंगळवारी कदम याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे यांनी खंडाळा येेथून ताब्यात घेतले. गणेश रासकरचा पूर्वीचा एक मित्र गणेश लक्ष्मण जाधव हाही काही कारणाने दुखावला होता. त्यालाही जेजुरी पोलिसांनी मंगळवारी नीरा येथून ताब्यात घेतले आहे.
गणेश रासकर याने गणेश लक्ष्मण जाधव (रा. नीरा, ता. पुरंदर) याची दुचाकी नऊ ते दहा महिन्यांपूर्वी जाळली होती. त्याचा गणेश लक्ष्मण जाधव याच्या मनात चीड होता. तसेच निखिल रवींद्र ढावरे त्याच्या पत्नीसोबत नऊ महिन्यांपूर्वी आरोपी गणेश रासकर यांनी गैरवर्तन केले होते. त्याचा ढावरे याला खटकला होता. गणेश रासकर स्वतःचे नीरा परिसरात वर्चस्व राहावे म्हणून गौरव लकडे याला दाबून ठेवत होता. त्याच्या पत्नीसोबत त्याचे संबंध होता. गौरव लकडे यांनी त्याला वेळोवेळी न्यायालयीन कामासाठी पैसे दिले होते. ते पैसेही तो दादागिरीच्या जोरावर परत देत नव्हता. म्हणून गणेश रासकर जेलमध्ये असताना तो परत बाहेर आल्यानंतर त्याचा खून करण्याचा नियोजित कट यावरील सर्वांनी केला असल्याचा पोलिसांना खात्री आहे. गुन्ह्यातील आरोपी गौरव जगन्नाथ लकडे याचा शोध सुरू आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करत असून, गुन्ह्यातील आरोपींना पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव कुतवळ, पोलीस हवलदार संदीप करंडे, संदीप मोकाशी, विठ्ठल कदम, धर्मवीर खांडे, अक्षय यादव, प्रवीण शेंडे यांनी अटक केलेली आहे. गुन्ह्याच्या तपासकामी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गायकवाड, सुदर्शन होळकर, राजेंद्र भास्कर, निलेश जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.