बांधकामाचे साहित्य चोरीप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:14+5:302021-05-18T04:11:14+5:30
पुणे: दुकानातील बांधकामांचे साहित्य चोरी करण्याबरोबरच बेकायदा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने ...
पुणे: दुकानातील बांधकामांचे साहित्य चोरी करण्याबरोबरच बेकायदा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने दि. १९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
संतोष कुंभार (वय ४४), राहूल अडगळे (वय २९), पवन बरडे (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आणखी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याबाबत ३४ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. दि. १८ ते २० डिसेंबर २०२० या दरम्यान भूमकर चौक परिसरात ही घटना घडली.
फिर्यादी यांचे हिंजवडी परिसरात दुकान आहे. दुकानात ठेवलेले तीन ट्रक बांबू, एक ट्रक वासे, तीन हजार वीटा, बांबू कटिंग मशीन, कोयता, हातोडी, खिळे, चोरी झाली असून, कॉपोर्रेशनच्या पाण्याचा मीटर, पाईप, नळ, सी. सी. टिव्ही कट करण्यात आले आहेत. तसेच दुकानात खड्डे खोदून मुरूम अशा एकूण ६ लाख ३३ हजारांच्या मुद्देमालाची चोरी करण्यात आली. तसेच या जागेवर जीवन भूमकर नावाचा बोर्ड लावून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी तिघांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी, गुन्ह्यातील वाहने जप्त करण्यासाठी, त्यांचा आणखी कोणी साथीदार आहे का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.
.....