दागिने चोरणाऱ्या तिघांना दिल्लीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:41 AM2018-08-13T02:41:27+5:302018-08-13T02:41:36+5:30

फ्लॅटचे कुलूप तोडून भरदिवसा चोरी करणाºया तीन चोरट्यांना युनिट चारच्या पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

Three arrested for stolen jewelery from Delhi | दागिने चोरणाऱ्या तिघांना दिल्लीतून अटक

दागिने चोरणाऱ्या तिघांना दिल्लीतून अटक

Next

पुणे : फ्लॅटचे कुलूप तोडून भरदिवसा चोरी करणाºया तीन चोरट्यांना युनिट चारच्या पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
मोहम्मद रिजवान अजमत अली (वय २६) , दीपक उर्फ दीपू उर्फ अजय सुभाष (वय २७) व उजेंद्र छत्रपालसिंह (वय ३८, तिघेही राहणार भसस्वा डेअरी, बिलासपूर, दिल्ली उत्तर पश्चिम, नवी दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निखिल सुरेश ताडीलकर (रा. सरोज सोसायटी, वडगाव शेरी) यांनी तक्रार दिली होती.
निखिल यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून १९० ग्रॅम सोने व ५ हजार ५०० एवढी रोख रक्कम चोरली होती. हा प्रकार २५ जूनला घडला होता. याबाबत निखिल यांनी चंदननगर पोलिसांत तक्रार दिली होती. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी दिल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार युनिट चारच्या पोलिसांनी या तिघांना दिल्ली, तिहार जेल व प्रतापगढ (उत्तर प्रदेश) येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडून १७ तोळे ४ ग्रॅम वजनाचे ५ लाख १५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. युनिट चारचे पोलीस उप आयुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल दरेकर, गायकवाड आणि कर्मचारी पोलीस हवालदार अजित धुमाळ, तुषार भिवरकर, सुभाष आव्हाड, तुषार खराडे, दत्ता शिंदे, सचिन कोळी यांनी तपास केला.

Web Title: Three arrested for stolen jewelery from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.