'अल कायदा'शी संबंध असलेले 3 बांगलादेशी पुणे एटीएसच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 01:49 PM2018-03-17T13:49:31+5:302018-03-17T13:49:31+5:30

दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे युनिटनं तीन बांगलादेशी नागरिकांना शनिवारी (17 मार्च) अटक केली आहे.

three bangladeshis arrested from ats pune unit suspicion of al qaeda linked to terrorist organizations | 'अल कायदा'शी संबंध असलेले 3 बांगलादेशी पुणे एटीएसच्या ताब्यात

'अल कायदा'शी संबंध असलेले 3 बांगलादेशी पुणे एटीएसच्या ताब्यात

googlenewsNext

पुणे -  दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे युनिटनं तीन बांगलादेशी नागरिकांना शनिवारी (17 मार्च) अटक केली आहे. या तिघांचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण, बांगलादेशात दहशतवादी कारवायांमुळे बंदी असलेल्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेचे सदस्य आहेत. ही संघटना अल कायदाशी संबंधित  आहे.

एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार,  दहशतवादी घटना रोखण्यासाठी देशात बेकायदा घुसखोरी करणाऱ्या परदेशी नागरिकांवर एटीएसची करडी नजर असते. तसेच या लोकांचा कोणत्याही दहशतवादी कारयावांमध्ये सहभाग आहे की नाही? याची गुप्तपणे तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान, एटीएसच्या पुणे युनिटला शहर परिसरात कोणतेही अधिकृत प्रवासी कागदपत्रे नसताना अनधिकृतरित्या काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असून हे तिघेही बांगलादेशात बंदी असलेल्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेशी संबंधीत असल्याची माहिती मिळाली होती.

Web Title: three bangladeshis arrested from ats pune unit suspicion of al qaeda linked to terrorist organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.