निरीक्षणगृहातून तीन मुले पसार
By admin | Published: April 24, 2017 04:59 AM2017-04-24T04:59:41+5:302017-04-24T04:59:41+5:30
शिवाजीनगरच्या निरीक्षणगृहातून तीन मुले पसार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. न्यायालयाच्या आदेशाने त्यांची रवानगी
पुणे : शिवाजीनगरच्या निरीक्षणगृहातून तीन मुले पसार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. न्यायालयाच्या आदेशाने त्यांची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली होती. पसार झालेल्या मुलांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पसार झालेल्या तिघांपैकी एका मुलाला खडकी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले.
निरीक्षणगृहातील कर्मचारी गणेभाऊ सारूक्ते (वय ५८, रा.बोपोडी) यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निरीक्षणगृहात दाखल करण्यात आलेल्या तीन मुलांच्या गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यात सहभाग होता. बालन्यायालय मंडळ बालसमितीमार्फत त्यांना गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते.
शनिवारी सकाळी निरीक्षणगृहातील मुलांना अंघोळीसाठी मागच्या बाजूला असलेल्या प्रसाधनगृहात पाठविण्यात आले तेव्हा तीन मुले पसार झाल्याचे निदर्शनास आले. पसार झालेल्यावर एका मुलावर घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता.
हा मुलगा खडकी भागात राहायला असल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. खडकी रेल्वेस्थानकाजवळच्या घरी पसार झालेला मुलगा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली
आणि त्याला पोलिसांनी
ताब्यात घेतले. बाकी दोन मुलांचा शोध घेणे सुरू आहे.