अर्ज भरण्यासाठी तीन दिवस शिल्लक
By admin | Published: December 7, 2014 11:50 PM2014-12-07T23:50:16+5:302014-12-08T00:05:45+5:30
निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी आता ३ दिवस शिल्लक असताना कँटोन्मेंट निवडणुकीसाठी शिवसेना- भाजपामध्ये युती होणार किंंवा कसे याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही.
पुणे : निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी आता ३ दिवस शिल्लक असताना कँटोन्मेंट निवडणुकीसाठी शिवसेना- भाजपामध्ये युती होणार किंंवा कसे याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही. आज रात्री या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची नागपूरमध्ये याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
भाजपा आणि शिवसेनेचे वरिष्ठ पातळीवरील नेते याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यानुसार स्थानिक पातळीवर कार्यवाही करू असे या पक्षाच्या खडकी कँटोन्मेंट निवडणुकीचे प्रभारी संदीप खर्डेकर यांनी सांगितले. नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी या निवडणुका युती करूनच व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. १० व ११ डिसेंबर रोजी अर्ज स्वीकृतीची तयारी पुणे कँटोन्मेंटने केली आहे. महिनाभर आधी या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे तयारी करणाऱ्या इच्छुकांच्या इच्छांवर नव्या राजकीय स्थितीमुळे पाणी फेरले. भाजपा पक्षकार्यालयात पुणे, खडकी कँटोन्मेंटसाठी सुमारे ९० जणांच्या मुलाखती झाल्या. त्यात खडकी कँटोन्मेंटकडून उमेदवारी मागणाऱ्या ५३ जणांचा समावेश आहे. माजी सदस्य अर्जुन खुर्पे, तसेच विनायक काटकर, शशिधर पुरम , डॉ.किरण मंत्री यांचा समावेश आहे. खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, पुणे कँटोन्मेंट प्रभारी रमेश काळे, खडकी कँटोन्मेंटचे प्रभारी संदीप खर्डेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)