तीन दिवस पावसाचे; वेधशाळेचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 06:05 AM2017-08-17T06:05:43+5:302017-08-17T06:05:47+5:30
पावसाने दीर्घकाळ उसंत दिल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (वेधशाळा) आनंदवार्ता दिली आहे.
पुणे : पावसाने दीर्घकाळ उसंत दिल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (वेधशाळा) आनंदवार्ता दिली आहे. शुक्रवारपासून राज्यात सर्वदूर पुन्हा पाऊस सुरू होईल तसेच पुढील तीन दिवस मुसळधार सरी बरसतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
पावसासाठी अनुकुल वातावरण निर्माण झाल्यामुळे गुरूवारपासूनच कोकण, मध्य-महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात बºयाच ठिकाणी पावसाचे आगमन होईल.
>शेतकºयांची चिंता मिटेल?
शुक्रवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतरही पुढील तीन दिवस पावसाचा जोर काम राहील, असा अंदाज आहे. पाऊस अचानक थांबल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाले होते. वेधशाळेने पुन्हा पावासाची शक्यता वर्तवल्याने शेतकºयांना दिलासा मिळेल.