Pune | पुण्यात विषारी औषध दिल्याने तीन कुत्र्यांचा मृत्यू; एकाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 05:21 PM2023-03-07T17:21:44+5:302023-03-07T17:23:27+5:30

अन्नपदार्थांतून उंदीर मारण्याचे विष देऊन त्यांना मारण्याचा प्रकार समोर...

Three dogs die after being given poison in Pune; A case has been registered against one | Pune | पुण्यात विषारी औषध दिल्याने तीन कुत्र्यांचा मृत्यू; एकाविरोधात गुन्हा दाखल

Pune | पुण्यात विषारी औषध दिल्याने तीन कुत्र्यांचा मृत्यू; एकाविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : कुत्र्यांच्या पिल्लांचा त्रास होतोय, या रागातून अन्नपदार्थांतून उंदीर मारण्याचे विष देऊन त्यांना मारण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अनिकेत संजय राजपूत (वय २८, रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नागेश सोनवणे (रा. सिद्धार्थ चौक, रामनगर, वारजे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रामनगरमधील सिद्धार्थनगर येथे १ मार्च रोजी घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ चौक येथील बापू घनगावकर यांच्या मोकळ्या पडीक जागेत कुत्री फिरत असतात. त्याचा त्रास होत असल्याने नागेश सोनवणे याने या कुत्र्यांच्या पिल्लांना उंदीर मारण्याचे विषारी औषध खाण्यातून दिले. त्यामुळे तेथील तीनही कुत्र्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

Web Title: Three dogs die after being given poison in Pune; A case has been registered against one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.