पुणे शहरात खळबळ! रेल्वे स्थानकात तीन जिलेटीनसदृश्य कांड्या आढळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 12:16 PM2022-05-13T12:16:55+5:302022-05-13T13:04:11+5:30

या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ माजली आहे

three gelatin sticks were found at the pune railway station crime news latest | पुणे शहरात खळबळ! रेल्वे स्थानकात तीन जिलेटीनसदृश्य कांड्या आढळल्या

पुणे शहरात खळबळ! रेल्वे स्थानकात तीन जिलेटीनसदृश्य कांड्या आढळल्या

Next

पुणे : शहरातील वर्दळीचे ठिकाण असणारे पुणेरेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकावर बीडीडीएसचं पथक दाखल झाले आहे. सध्या पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. 1 आणि 2 रिकामे करण्यात आले आहे. पोलिसांच्या बीडीडीएसचं पथकाला संशयित वस्तूमध्ये तीन जिलेटीन सदृश्य वस्तू आढळल्या आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

तासाभरानंतर पुणे रेल्वे स्टेशनवरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. पुणे स्टेशनवर सापडलेली संशयास्पद वस्तू स्फोटक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच कुणीही या प्रकारामुळे घाबरू नये असं आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले.

काही वेळापूर्वी पुणे स्टेशनवरील दर्ग्याच्या जवळ बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा संशय आरपीएफच्या जवानांना आल्यावर त्यांनी तत्काळ याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या बीडीडीएसच्या पथकाने तिथून तीन जिलेटीन सदृश्य वस्तू जप्त केली. बी जे मेडिकल महाविद्यालयाच्या मैदानावर ही वस्तू निकामी करण्यात आली.

यावर बोलताना पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, रेल्वे स्टेशनवर संशायास्पद वस्तू आढळल्या आहेत, पण त्या जिलेटीनच्या कांड्या नाहीत. यामध्ये कोणताही स्फोटक पदार्थ नव्हता. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रवाशांनी घाबरू नये.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे रेल्वे प्रवाशाने परिसर गजबजलेला होता. आकराच्या सुमारास फलाट क्रमांक एकवार काही बॅगांच्या जवळ बॉम्ब सदृश्य वस्तू दिसून आली. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. लगेच बंडगार्डन पोलिसांनी धाव घेतली. त्यापाठोपाठ बीडीडीएसही श्वान घेऊन दाखल झाले. तपासणी केल्यानंतर 3 जिलेटीनसदृश्य कांड्या आढळून आल्या. त्यानुसार बिडीडीएस आणि बंडगार्डन पोलिसांनी त्या ताब्यात घेऊन जवळच्या एका मैदानात नेल्या. तेथे तो बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Read in English

Web Title: three gelatin sticks were found at the pune railway station crime news latest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.