चाकण-तळेगाव रस्त्यावर तीनशे वर्षापूर्वीचे झाड पडले, वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 11:39 PM2019-07-30T23:39:07+5:302019-07-30T23:39:22+5:30
हनुमंत देवकर चाकण : खालुंब्रे ( ता.खेड ) गावच्या हद्दीत मंगळवारी ( दि. ३० ) रात्री पावणे दहाच्या सुमारास ह्युंदाई ...
Next
हनुमंत देवकर
चाकण : खालुंब्रे ( ता.खेड ) गावच्या हद्दीत मंगळवारी ( दि. ३० ) रात्री पावणे दहाच्या सुमारास ह्युंदाई चौकात तीनशे वर्षापूर्वीचे पुरातन वडाचे झाड पडल्याने चाकण-तळेगाव रस्ता बंद पडला आहे.
भर रस्त्यावर झाड पडल्याने मुंबईहून चाकण मार्गे नगर व औरंगाबाद कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. हे झाड रस्त्याने जाणाऱ्या टेम्पो व कार वर पडले, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या स्विफ्ट कार मधून येथील कायकर्ते शरद बोत्रे जात होते, सुदैवाने ते या घटनेतून बचावले आहेत.