एकाच व्यासपीठावरुन तीन अधिकाऱ्यांनी मांडला पुण्याचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 07:39 PM2018-03-22T19:39:32+5:302018-03-22T19:45:08+5:30

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे विविध मान्यवरांसह वार्तालापाचे अायाेजन करण्यात येते. यावेळी शहर व जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिक बजावणाऱ्या तीन सनदी अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात अाले हाेते. त्यांनी शहराच्या व जिल्ह्याच्या एकूण विकासाचा अाढावा घेतला.

three IAS officers speak about punes development | एकाच व्यासपीठावरुन तीन अधिकाऱ्यांनी मांडला पुण्याचा विकास

एकाच व्यासपीठावरुन तीन अधिकाऱ्यांनी मांडला पुण्याचा विकास

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात येत्या काळात 32 हजार काेटींची कामे करण्यात येणारहायपूर लूप सेवेबाबत चाचपणी सुरु

पुणे : भारतातील राहण्यास सर्वात उत्तम असलेले शहर, आयटीने दिलेली नवी ओळख, शिक्षणाचा माहेरघर ते स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे शहर,  अश्या विविध ओळख प्राप्त करणाऱ्या पुण्याच्या विकासाचा आराखडा तसेच शहर व जिल्ह्या समोरील आव्हाने तीन अधिकाऱ्यांनी एकाच व्यासपीठावरुन मांडली. 
    निमित्त होते पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित पुण्याची सद्यस्थिती आणि विकासाची दिशा या विषयावरील वार्तालापाचे. पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरव राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते या तिघा अधिकाऱ्यांनी पुण्यातील विकास कामे, येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच उभी ठाकलेली आव्हाने यांबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. 
    कुणाल कुमार म्हणाले, २०१४ साली मी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पुण्याच्या १५२ विषयांवर काम करण्याची गरज असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावर काम करण्यास सुरुवात केली. शहरातील नागरिकांचा शहराच्या विकासाबद्दलच्या सुचनांमध्ये मोठा सहभाग असतो. एका अहवालानुसार पुणे हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे राहण्यास उत्तम शहर असल्याचे समाेर अाले आहे.  प्रत्येक पुणेकर घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला शहर आपलं स्वागत करीत असल्याची भावना निर्माण झाली पाहिजे. यादृष्टिने काम करण्यात येत आहे. शहराला जास्तीत जास्त डिजिटायज करण्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात शहरात 32 हजार काेटींची कामे करण्यात येणार अाहेत.  
    सौरव राव म्हणाले, पुणे जिल्ह्याची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. जिल्ह्याची वाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. येत्या काळातही 190 गावांचा या उपक्रमात सहभाग करुन घेण्यात येणार अाहे.  प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा थर्ड पार्टीकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामीण क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देण्याचं काम करण्यात येत आहे. पुरंदरमध्ये प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी ज्यांच्या जागा घेण्यात येत आहेत, त्यांना त्रास होणार नाही, व त्यांना योग्य मोबादला कसा मिळेल याकडे लक्ष देण्यात येत आहे. 
    गित्ते म्हणाले, पुणे महानगरचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पीएमआरडीएला आर्थिक स्वावलंबी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रो ही पीपीटी तत्त्वावर करण्यात येणार आहे. हायपर लूप बाबतही प्राथमिक चाचणी करण्यात येत असून, पुणे - मुंबई दरम्यान हायपर लूप सेवा सुरु करणे शक्य आहे का, याबाबतची पाहणी सध्या करण्यात येत आहे. 

Web Title: three IAS officers speak about punes development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.