मोबाईल चोरीच्या एकाच दिवसात तीन घटना, नागरिकांमध्ये निर्माण झाले भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 08:51 PM2021-03-13T20:51:24+5:302021-03-13T20:52:05+5:30
मोबाइल हिसकवण्याच्या तीन घटना
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मोबाईल चोरीच्या एका दिवसात तब्बल तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिल्या घटनेत सरिता भरत देशमुख (वय ३९, रा.निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यमुनानगर, निगडी येथे शतपावली करत होत्या. दरम्यान, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या हातातील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला.
दुसऱ्या घटनेत मयुरी भीमराव पुजारी (वय २२, रा.रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी ७ मार्च रोजी कस्पटेवस्ती येथे मॉर्निंग वॉक करीत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला.
तिसऱ्या घटनेत गायत्री संतोष सुळकर (वय १९, रा. पिंपळे सौदागर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ बसची वाट पाहत होत्या. त्यावेळी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरटयांनी त्यांच्या हातातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला.