इंदापुरात तिघांना डेंग्यूची लागण
By admin | Published: September 20, 2014 11:33 PM2014-09-20T23:33:09+5:302014-09-20T23:33:09+5:30
शहरातील सरस्वतीनगर भागात राहणा:या तिघांना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय आहे. तिघांपैकी एकावर औषधोपचार पूर्ण झाले आहेत.
Next
इंदापूर : शहरातील सरस्वतीनगर भागात राहणा:या तिघांना डेंग्यूची लागण झाल्याचा संशय आहे. तिघांपैकी एकावर औषधोपचार पूर्ण झाले आहेत. एक जण तीन दिवसांपासून तर आणखी एक जण काल रात्रीपासून खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाला आहे.
शहरात डेंग्यूचे आणखी रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. दरम्यान, येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी, सरस्वतीनगर भागाची पाहणी करून माहिती घेण्यासाठी संबंधित विभागाच्या कर्मचा:यांस पाठविले आहे.
गेल्या आठवडय़ापासून डेंग्यूसंदर्भात नागरिकांमध्ये चर्चा होती. उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. काळे यांचेकडे विचारणा केल्यानंतर डेंग्यूचे अथवा डेंग्यूसदृश रोगाचे लक्षण आढळलेले रुग्ण तपासणीकरिता रुग्णालयात आलेच नाहीत असे त्यांनी सांगितले होते; मात्र दवाखाने, रुग्ण आढळलेल्या परिसराची माहिती दिल्यानंतर त्यांनी सरस्वतीनगर भागात त्यांचे कर्मचारी पाठविले. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
4सरस्वतीनगर भागासह डॉ. आंबेडकरनगर, साठेनगर, वडारगल्लीकडील काही भाग, श्री संत सावतामाळीनगर लगतच आठभाई मळा परिसरातील पट्टा या भागात चिखल, दलदल, अस्वच्छता, झाडेझुडपे आणि डासांचा प्रादुर्भाव असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नगर परिषदेने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे.