रानडुकराच्या हल्यात तिन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:15+5:302021-04-30T04:15:15+5:30
चासकमानधरण परिसरात कडधे कान्हेवाडी येथील डोंगरदऱ्यात रानडुकरे आहेत. मोहकल बाजुकडुन हा दहा बारा रानडुकरांचा कळप हुसकावण्यात आला. कडधे येथे ...
चासकमानधरण परिसरात कडधे कान्हेवाडी येथील डोंगरदऱ्यात रानडुकरे आहेत. मोहकल बाजुकडुन हा दहा बारा रानडुकरांचा कळप हुसकावण्यात आला. कडधे येथे वाडा रस्त्यावर सैरभैर झालेला हा कळप आला. मात्र तेथुन हुसकावण्यात आल्याने हा कळप डोंगराकडे निघुन गेला. मात्र एक रानडुकर कळपातुन चुकल्याने सैरभैर झालेल्या या रानडुकरांने कडधे येथे शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांवर चाल केली. शेतकऱ्यांना या डुकरांने धडका जोरदार धडका मारल्या. या हल्यात एका शेतकरी महिलेसह दोन शेतकऱ्यांना जखमी केले. शेतकऱ्यांच्या तोंडावर, पायावर जखमा झाल्या आहेत. हल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना खाजगी रुग्णांलयात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. वनविभागान या परिसरात धुमाकुळ घातलेेल्या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.