विमानतळावरून तीन किलो सोने जप्त, दुबईहून केली होती तस्करी, प्रवासी बॅग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणात लपविले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:42 AM2017-09-12T03:42:47+5:302017-09-12T03:43:01+5:30

लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सीमा शुल्क विभागाने दुबईहून तस्करी करून आणलेले एक कोटी रुपये किमतीचे ३ किलो १५९ ग्रॅम सोने सोमवारी जप्त केले. याप्रकरणी कर्नाटकातील भटकळ गावातील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Three kg of gold seized from the airport, hidden from smuggled from Dubai, travel bags and electronic equipment | विमानतळावरून तीन किलो सोने जप्त, दुबईहून केली होती तस्करी, प्रवासी बॅग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणात लपविले  

विमानतळावरून तीन किलो सोने जप्त, दुबईहून केली होती तस्करी, प्रवासी बॅग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणात लपविले  

Next

पुणे : लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सीमा शुल्क विभागाने दुबईहून तस्करी करून आणलेले एक कोटी रुपये किमतीचे ३ किलो १५९ ग्रॅम सोने सोमवारी जप्त केले. याप्रकरणी कर्नाटकातील भटकळ गावातील एका व्यक्तीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दुबईहून आलेल्या एका व्यक्तीच्या तपासणीत प्रवासी बॅग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणात कच्चे सोने लपवून आणले होते. बॅगेच्या तळाशी असलेल्या लाईनमध्ये सोन्याची वायर, तर इमर्जन्सी एलईडी लाईट उपकरणात ७ बिस्कीट आणि डिजिटल अ‍ॅम्प्लिफायरमध्ये ५९ गोल्ड प्लेट लपवून आणल्या होत्या. तसेच, मुबंई येथे वास्तव्यास असलेला एक साथीदार विमानतळाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. त्यालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाचे सहायक आयुक्त मनीष दूदपुरी यांनी ही माहिती दिली.
सोने तस्करीत भटकळ गाव सातत्याने समोर येत आहे. यापूर्वीदेखील लोहगाव विमानतळावरून आॅक्टोबर २०११ मध्ये येथील नूर मोईनुद्दीन बाप्पा याला अटक केले होते.
भटकळ गाव आंतरराष्ट्रीय सोने तस्करीचे केंद्र झाले असल्याचा संशय तपास अधिकाºयांना आहे. या तस्करीच्या साखळीत काही
कापड व्यावसायिकदेखील गुंतले असल्याचा तपास अधिकाºयांना दाट संशय आहे.


 

Web Title: Three kg of gold seized from the airport, hidden from smuggled from Dubai, travel bags and electronic equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.