Pune Crime: तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

By नितीश गोवंडे | Published: October 4, 2023 06:35 PM2023-10-04T18:35:58+5:302023-10-04T18:36:13+5:30

टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू....

Three killed in three separate accidents; Two people were seriously injured pune crime | Pune Crime: तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

Pune Crime: तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

googlenewsNext

पुणे : शहरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले तर दोन जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पहिल्या घटनेत टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत रिक्षातील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात येरवडा येथील शांती रक्षक सोसायटी समोर परिसरात घडला. यश बाळासाहेब खरचंद (१८) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर मयुरी खरचंद आणि अरविंद जाधव अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी मनाली खरचंद (२४, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनाली या त्यांचा भाऊ यश, बहीण मयुरी हे २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास रिक्षाने प्रवास करत होते. त्यावेळी शांती रक्षक सोसायटी परिसरात समोरून आलेल्या भरधाव टेम्पोने रिक्षाला धडक दिली. या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान यशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विष्णू होले करत आहेत.

दुचाकीस्वार महिलेने दिलेल्या धडकेत पादचारी ठार...

आंबेगाव परिसरात एका दुचाकीस्वार महिलेने पादचाऱ्याला दिलेल्या धडकेत पायी जाणारा तरूण ठार झाला. हा अपघात २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. मदन नवराज परिहार (२७, रा. बालाजीनगर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रामसिंग परिहार (४२, रा. नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक मोहन देशमुख पुढील तपास करत आहेत.

टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू...

हडपसर परिसरात झालेल्या एका अपघातात टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. रवींद्रनाथ रामनकुट्टी नायर (५९, रा. निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा श्रीराम नायर (२४) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक अमोल कामठे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Three killed in three separate accidents; Two people were seriously injured pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.