एमबीबीएसला अॅडमिशन करून देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 07:23 PM2018-04-30T19:23:20+5:302018-04-30T19:23:20+5:30
एमबीबीएस कॉलेजला अॅडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : एमबीबीएस कॉलेजला अॅडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सुलोचना कापसे (वय ४८, रा. लोअर इंदिरानगर बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार दिलीप नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला एम.बी.बी.एस कॉलेजला प्रवेश घ्यायचा होता. त्याकाळात त्यांची दिलीप यांच्याबरोबर ओळख झाली. त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला व अॅडमिशन मिळवून देण्यासाठी १५ लाखांची मागणी केली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी ३० जुलै २०१७ पासून दिलीप याला रोख एक लाख रुपये व २ लाख ५० हजार आॅनलाइन ट्रान्सफर केले. मात्र, त्याने अॅडमिशन मिळवून न दिल्याने फिर्यादी यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. परंतु त्यांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली. दरम्यान, त्याने दिलेले २ लाख २५ हजार रुपयांचे चेक देखील झाला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कापसे यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा तपास स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस.ए. पाटील करत आहेत.