Pune: आंबेगाव तालुक्यातील शिंगव्यात आढळली बिबट्याची तीन बछडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 05:31 PM2023-12-30T17:31:34+5:302023-12-30T17:32:06+5:30
वनविभाग व रेस्क्यू टीमच्या मदतीने तिन्ही बछडे आईच्या कुशीत स्वाधीन करण्यात यश आले आहे....
अवसरी (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे शनिवारी (दि. ३०) रोहिदास रंगु गोरडे यांच्या शेतात ऊस तोडणी चालू असताना उसात बिबट्याची तीन बछडे आढळून आली होती. वनविभाग व रेस्क्यू टीमच्या मदतीने तिन्ही बछडे आईच्या कुशीत स्वाधीन करण्यात यश आले आहे.
शिंगवे येथे मागील पंधरा दिवसात दुसऱ्यांदा बिबट्याची बछडे सापडण्याची ही घटना आहे. रोहिदास रंगू गोरडे यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणीदरम्यान ऊस तोडणी कामगारांना साधारण वीस ते पंचवीस दिवस वयाची तीन बछडे आढळून आली, लगेचच रेस्क्यू सदस्य दत्तात्रय माधवराव राजगुरव व शारदा दत्तात्रय राजगुरव शिंगवे निरोप मिळताच यांना ही माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले.
वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस मॅडम यांना या घटनेची माहिती मिळताच त्याच्या मार्गदर्शनाखाली. वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक पोत्रे, दत्तात्रय राजगुरव, शारदा राजगुरव, शरद जाधव, संपत भोर व सूरज भोर हे घटनास्थळी पोहचले. रेस्क्यू टीम सदस्य दत्तात्रय राजगुरव व शारदा दत्तात्रय राजगुरव शिंगवे यांनी बिबट पिल्लांना पुन्हा आईच्या कुशीत सोडली.